Afghanistan : विमाने रोखल्याने शेकडो जण अडकले

तालिबानी राजवटीपासून सुटका मिळविण्याकरिता देश सोडून जाणारे शेकडो लोक अद्याप देखील अफगाणिस्तान मध्ये अडकून पडले आहेत.
Afghanistan : विमाने रोखल्याने शेकडो जण अडकले
Afghanistan : विमाने रोखल्याने शेकडो जण अडकलेSaam Tv

वृत्तसंस्था : तालिबानी राजवटीपासून सुटका मिळविण्याकरिता देश सोडून जाणारे शेकडो लोक अद्याप देखील अफगाणिस्तान मध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये अनेक अमेरिकी नागरिकांचा समावेश असून, त्यांना नेण्याकरिता आलेली ४ खासगी विमाने मझार ए शरीफ या ठिकाणी विमानतळावरच उभी आहेत.

त्यांना तालिबानने अद्याप उड्डाणाची परवानगी दिली नाही. अडकून पडलेल्या नागरिकांपैकी काही जण अमेरिकेचे असले, तरी बहुतांशी लोक अफगाणीच असल्याचे मझार ए शरीफ विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. या अफगाणी लोकांकडे पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याचे दावे या अधिकाऱ्याने केला आहे. मात्र, या लोकांची सुटका करण्याकरिता अमेरिकेवर दबाव वाढत आहे.

हे देखील पहा-

आमचे लोक विमानात बसलेले आहेत. मात्र, विमान उड्डाणास परवानगीच मिळत नाही. याचाच दुसरा अर्थ म्हणजे, अमेरिकेच्या लोकांना तालिबानने ओलिस ठेवले आहे. असा आरोप अमेरिकी संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीने यावेळी केला आहे. या सर्वांना अफगाणिस्तान बाहेर जाऊ देण्याच्या बदल्यात अमेरिकेकडून अनेक मागण्या मंजूर करून घेण्याचा तालिबानचा डाव असल्याचे या समितीने व्यक्त केले आहे.

Afghanistan : विमाने रोखल्याने शेकडो जण अडकले
Taliban: पंजशीर युद्धात पाकिस्तानची थेट उडी; हवाई दलाकडून जोरदार बॉम्बफेक सुरु

मझर ए शरीफ विमानतळावर काही काळाअगोदर आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु झाली आहेत. ही विमाने फक्त तुर्कस्तान पर्यंतच जात आहेत. येथे अडकून पडलेली विमाने कोणी पाठविली आणि कधीपासून ती अडकून पडली आहेत, याबाबत माहिती देण्यात आली नाही. अफगाणिस्तान मध्ये मदतकार्य करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आणि इतर संघटनांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी तालिबानने दिली, असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांनी केला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मदतकार्य विभागाचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ यांनी तालिबानचा म्होरक्या मुल्ला अब्दुल घनी बरादर याची भेट घेऊन त्याच्याकडून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे आश्‍वासन घेण्यात आले आहे. अफगाणिस्तान मधील महिला आणि अल्पसंख्याकांना त्यांचे अधिकार देण्याचे आवाहन देखील ग्रिफिथ यांनी तालिबानला केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com