Shraddha Murder Case : आफताबला निवडणुकीत रस, पोलिसांना विचारले गुजरात-दिल्ली एमसीडी कोणाची सत्ता येणार

आफताब पोलिसांना निवडणुकीशी संबंधित प्रश्न विचारतो. तसंच कोण जिंकतंय, कोणाचं सत्ता येणार यावरही चर्चा करतो.
Shraddha Walker Case aftab poonawala
Shraddha Walker Case aftab poonawalaSaam TV

Shraddha Murder Case : दिल्लीतील (Delhi) श्रद्धा वालकर खूनप्रकरणातील आरोपी आफताब तिहार तुरुंगात बंद आहे. काही दिवसांपूर्वी आफताब याने तिहार तुरुंग प्रशासनाकडे वाचणासाठी कांदबरी आणि साहित्याची पुस्तके देण्यााची मागणी केली होती. त्यानंतर आता आरोपी आफताबला गुजरात (Gujarat) आणि एमसीडी निवडणुकीत रस असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आफताबने सेलच्या बाहेर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून गुजरात आणि दिल्ली एमसीडी निवडणुकीची माहिती घेतली.

Shraddha Walker Case aftab poonawala
Beed Crime : विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यासाठी ५० हजारांची लाच; पोलीस उपनिरीक्षकांसह काँन्स्टेबल रंगेहाथ

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब सुरक्षा कर्मचाऱ्यांशी निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलतो. तो पोलिसांना निवडणुकीशी संबंधित प्रश्न विचारतो. तसंच कोण जिंकतंय, कोणाचं सत्ता येणार यावरही चर्चा करतो.

आफताबाने तुरुंगात वाचणासाठी कांदबरी आणि साहित्याची पुस्तके देण्यााची मागणी प्रशासनास केली आहे. यावर तुरुंग प्रशासनाकडून लवकरच त्याला पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशी माहिती तिहार तुरुंगातील सुत्रांकडून देण्यात आली आहे.

न्यायालयाने आफताब पूनावाला यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. यानंतर त्यांना तिहार तुरुंगात हलवण्यात आले. आफताबला तिहारच्या तुरुंग क्रमांक 4 मध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव विशिष्ठला वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले आहे. येथे सीसीटीव्हीद्वारे २४ तास नजर ठेवली जात आहे.

तिहार तुरुंगात आफताबला ज्या सेलमध्ये ठेवण्यात आले आहे त्याला स्वतंत्र सेल म्हणतात. ज्यामध्ये फक्त एक कैदी ठेवण्यात आला आहे. या कोठडीतून कैद्याला लवकर बाहेर काढले जात नाही. त्यात राहणाऱ्या कैद्याला पोलिसांच्या उपस्थितीत जेवण दिले जाते आणि एक सुरक्षा रक्षक कोठडीबाहेर नेहमीच तैनात असतो. या कोठडीतील कैद्यांना उर्वरित कैद्यांपासून वेगळे ठेवले जाते.

Shraddha Walker Case aftab poonawala
Beed Crime : विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यासाठी ५० हजारांची लाच; पोलीस उपनिरीक्षकांसह काँन्स्टेबल रंगेहाथ

आफताब तुरुंगात एकटाच बुद्धिबळ खेळतो

श्रद्धा खून प्रकरणात आफताबला पोलिसांकडून अनेक तास चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्याची पॉलीग्राफी झाली आणि नंतर नार्को टेस्ट. प्रत्येक वेळी त्याने हुशारीने उत्तरे दिली. आतापर्यंतच्या तपासात त्याच्याकडून काही नवीन माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही. चौकशीदरम्यान तो नेहमी शांत दिसला. 

आता त्याच्या छंदाशी संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. त्याला बुद्धिबळ हा खेळ खूप आवडतो, असे कळते. तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅरेक क्रमांक-4 मध्ये बंद असलेला आफताब वेळ घालवण्यासाठी तासन्तास बुद्धिबळ खेळतो. तो त्याच्या बॅरेकमध्ये एकटाच बुद्धिबळाचा पट लावतो.

काय आहे श्रद्धा खून प्रकरण?

मुंबईतील शेफ आणि फोटोग्राफर आफताब पूनावाला याने दिल्लीत त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वलकरची हत्या केली होती. 18 मे रोजी त्याने तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने मृतदेहाचे 35 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात घरात सुमारे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर ते तुकडे जंगलात फेकून दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com