दोन वर्षांनंतर भारतात नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू; प्रवाशांना मिळू शकेल 'गुड न्यूज'

कोरोनामुळे प्रभावित झालेली विमानसेवा हळूहळू रुळावर येत असून, नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाल्याने कंपन्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
plane
plane Saam tv news

नवी दिल्ली - कोरोना (Corona) महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे (Flight) विस्कळीत झाली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून आजपासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या पार्श्वभूमीवर सर्वच विमान कंपन्यांनी आपली तयारी पूर्ण केली आहे. भारतीय विमान कंपन्यांव्यतिरिक्त, एमिरेट्स आणि वर्जिन अटलांटिक या सारख्या परदेशी विमान कंपन्या देखील नियमित उड्डाणे पुन्हा सुरू करण्याबद्दल खूप उत्सुक आहेत.

हे देखील पहा -

राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (IGIA) अपेक्षा आहे की, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये वाढ होईल. कोरोनामुळे प्रभावित झालेली विमानसेवा हळूहळू रुळावर येत असून, नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाल्याने कंपन्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

गेल्या २ वर्षांपासून विमान सेवा बंद होती, मात्र बाकी सर्व खर्च चालूच असल्यामुळे विमान कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र आता कोरोनाची लाट ओसरल्याने आजपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाल्याने विमान कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.

plane
सांगलीत अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणावरून श्रेयवाद

आजपासून पूर्ण क्षमतेने आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाल्याने परदेशात जाणाऱ्या विमानांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. यापूर्वी काही ठराविकच विमानांचे उड्डाण होत असल्यामुळे तिकिटांच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र आता विमानांची संख्या वाढवण्यात येणार असल्याने प्रवास स्वस्त होण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com