फडणवीसांकडे बिहारनंतर आता गोव्याची जबाबदारी, ५ राज्यांत होणार आहे निवडणुका

२०२२ मध्ये देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात गोवा राज्याचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
फडणवीसांकडे बिहारनंतर आता गोव्याची जबाबदारी, ५ राज्यांत होणार आहे निवडणुका
फडणवीसांकडे बिहारनंतर आता गोव्याची जबाबदारी, ५ राज्यांत होणार आहे निवडणुकाSaam Tv News

नवी दिल्ली: राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाने नवीन जबाबदारी सोपवली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. २०२२ मध्ये देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात गोवा राज्याचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. (After Bihar, now Fadnavis has the responsibility of Goa, elections will be held in 5 states)

हे देखील पहा -

याआधी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस हे बिहारचे निवडणुक प्रभारी होते. बिहारमध्ये फडणवीसांनी चांगली कामगिरी केल्याने भाजपला बिहारमध्ये चांगले यश मिळाले होते. त्यामुळे यावेळी गोवा राज्याच्या निवडणुक प्रभारीपदी त्यांची नियुक्ती केली गेली आहे. देशातल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्या दृष्टीने भाजपने प्रत्येक राज्यात निवडणुक प्रभारी नेमले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडे देण्यात आलेली जबाबदारी अतिशय महत्वपुर्ण आहे.

फडणवीसांकडे बिहारनंतर आता गोव्याची जबाबदारी, ५ राज्यांत होणार आहे निवडणुका
भाजपनंतर मनसेने हाती घेतले टाळ..म्‍हणाले ‘उद्धवा अजब तुझे सरकार’

गोव्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे तर, उत्तराखंडची जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवली आहे. पंजाबची जबाबदारी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे तर मणिपूरसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या राज्याचे प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसल्याचे दिसते आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com