ISRO Gaganyaan Mission: चांद्रयान-३ आणि आदित्य-एल 1 नंतर आता पुन्हा इतिहास रचणार; प्रक्षेपण ते संपूर्ण मिशनची माहिती जाणून घ्या...

Isro Upcoming Missions: चांद्रयान-३ आणि आदित्य-एल 1 नंतर आता पुन्हा इतिहास रचणार; प्रक्षेपण ते संपूर्ण मिशनची माहिती जाणून घ्या...
ISRO Gaganyaan Mission
ISRO Gaganyaan MissionSaam Tv

ISRO Gaganyaan Mission:

चांद्रयान-3 चांद्र मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आणि भारताची पहिली सौर मोहीम, आदित्य L1, लॉन्च करण्यात आली. यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) गगनयान मोहिमेसाठी सज्ज झाली आहे.

अशातच ऑक्टोबर महिन्यात इस्रो देशातील पहिल्या मानव रहित अंतराळ उड्डाणाची चाचणी करेल, अशी अपेक्षा. सध्या इस्रोकडे हेवी-लिफ्ट LVM-3 रॉकेट्स आहेत. जे मानव-रेट केलेले प्रक्षेपण वाहनमध्ये (HRLVs) विकसित केले जात आहेत. भविष्यात क्रू मॉड्युल आणि भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यास सक्षम बनवले जात आहे. सतीश धवन अंतराळ केंद्राचे संचालक राजराजन यांनी या नवीन मोहिमेचे महत्त्वाचे तपशील शेअर केले आहेत.

ISRO Gaganyaan Mission
Chandrayaan-3: चंद्रावरील लाल आणि निळे चिन्ह काय आहेत? प्रज्ञान रोव्हरने पाठवले नवीन फोटो

मोहीम अयशस्वी होऊ नयेत यासाठी सर्व यंत्रणा उच्च सुरक्षा मार्जिनने विकसित केल्या जातील, यावर त्यांनी भर दिला आहे. क्रू मॉड्युल लॉन्च व्हेइकलमध्ये कोणतीही चूक झाल्यास त्यातील अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर काढता येईल, याची खात्री करण्यासाठी क्रू एस्केप सिस्टम लागू केली जाईल. (Latest Marathi News)

कशी सुरु आहे तयारी?

ISRO सध्या गगनयान मोहिमेसाठी विविध चाचण्या घेत आहे. ज्यामध्ये क्रू मॉड्यूलच्या ड्रॉप चाचण्या, हाय-अल्टीट्यूड ड्रॉप टेस्ट आणि पॅड एस्केप चाचण्यांचा समावेश आहे. जिथे क्रू एस्केप सिस्टम अंतराळवीरांना बाहेर काढेल आणि त्यांना सुरक्षित अंतरावर घेऊन जाईल.

ISRO Gaganyaan Mission
Explainer: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचणी काय? जाणून घ्या...

याबाबत माहिती देताना राजराजन म्हणाले, “आमच्याकडे एक वाहन प्रकल्प देखील आहे. जिथे L-40 इंजिन, एक GSLV बूस्टर, टॉपवर क्रू मॉड्यूलसह ​लॉन्च केले जाईल.''

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com