सात फेरे घेतानाच दिसला नवरदेवाचा टक्कल, नवरीचा भर मांडवात तमाशा, नंतर...

हल्ली लग्नांमध्ये काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे अनेकवेळा वराला विना नवरी घरी यावे लागते.
Uttar Pradesh
Uttar Pradesh SaamTV

उत्तर प्रदेश: हल्ली लग्नांमध्ये काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे अनेकवेळा वराला विना नवरी घरी यावे लागते. यूपीच्या उन्नावमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे फेरे सुरू असतानाच वराची पोलखोल झाली आहे. यानंतर वधूने लग्नाला नकार दिला. शुक्रवारी रात्री सफीपूरच्या कोतवाली भागातील वराची मिरवणूक आली होती.

थाटामाटात आलेल्या या मिरवणुकीचे मुलीच्या घरच्यांनी जल्लोषात स्वागत केले. यानंतर जयमालाचा विधी पार पडला. यानंतर वधू-वर जेवन करुन सातफेरे घेण्यासाठी निघून गेले. इथे गेल्यावर वराला अचानक चक्कर आली आणि तो जमीनीवर कोसळला. वराला जमिनीवर पडलेले पाहून मुलीच्या भावाने वराच्या डोक्यावर हात फिरवताच वराचा विग त्याच्या हातात आला. वराच्या डोक्यावर केस नाहीत हे पाहून मुलीला धक्का बसला. त्यानंतर वधूने लग्नाला नकार दिला.

Uttar Pradesh
Ramban Tunnel Collapse: 9 मृतदेह बाहेर काढले; अनेक मजूर अडकल्याची भीती

सफीपूर कोतवाली परिसरातील परियार गावातील रहिवासी लखन कश्यप यांची मुलगी निशा हिचा विवाह कानपूर नगर पोलीस स्टेशन कल्याणपूर येथील आवास विकास कॉलनी येथील अशोक कुमार कश्यप यांचा मुलगा पंकज याच्याशी ठरला होता. सफीपूर येथील एका गेस्ट हाऊसमध्ये मिरवणूक निघाली होती, तेव्हा जयमाला वगैरे कार्यक्रम आटोपल्यानंतर वराला चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला. त्यावर वधूचे भाऊ नितीन व विपिन आदींनी वराच्या तोंडावर व डोक्यावर पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली व वराच्या डोक्याला हात लावला.

इतक्यात डोक्यावरचा केसांचा विग भाऊ नितीनच्या हातात आला. हे पाहून उपस्थित कुटुंबीयांनी वराचे वडील अशोक कुमार यांनी फसवणूक केल्याचे सांगितले. वधू आणि कुटुंबीयांनी लग्न करण्यास नकार दिला आहे. प्रकरण वाढल्यावर कोणीतरी पोलिसांना कळवले. परियार चौकीचे प्रभारी रामजीत यादव मे फोर्सचे घटनास्थळी पोहोचले. सकाळी पोलिसांसमोर दोन्ही बाजूंचे म्हणणं मांडण्यात आले. लग्नाला झालेला ५ लाख रुपये खर्च वराच्या घरुन घेवून ते कुटुंब आपल्या गावाला रवाना झाले.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com