आता जवाहिरीचा जावई मोहम्मद अब्बते अल कायदाची गादी सांभाळणार!

अब्बते हा मोरोक्कनमध्ये जन्मलेला दहशतवादी अल-जवाहिरीचा जावई आहे.
Al-Zawahiri
Al-ZawahiriSaam Tv

Al-Zawahiri: अमेरिकेने अफगाणिस्तानात घुसून सर्वात मोठी कारवाई केली आहे. सीआयएच्या (CIA) ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा दहशतवादी अल जवाहिरीला ठार मारण्यात आलं आहे. अफगाणिस्तानातील काबूल येथे ड्रोन हल्ल्यात जवाहिरी मारला गेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी त्याला दुजोरा दिला आहे. अल जवाहिरीवर अमेरिकेने 25 मिलियन डॉलरचं बक्षिस ठेवलं होतं.

जवाहिरीच्या मृत्यूनंतर अमेरिका आता त्याचा जावई मोहम्मद अब्बते याच्या शोधात आहे. अब्द-अल-रहमान अल-मघरेबी उर्फ ​​अब्बतेसाठी 7 मिलियन डॉलरचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

हे देखील पाहा -

अमेरिकेने दहशतवादी अब्बतेबाबद म्हटले की, ज्याला अल मोहम्मद अब्बतेबद्दल माहिती आहे तो टेलिग्राम किंवा व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज करून माहिती देऊ शकतो. यासाठी एक नंबरही जारी करण्यात आला असून माहिती देणाऱ्या व्यक्तीला 7 मिलियन डॉलरचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, मोहब्बत अब्बते याला अब्द-अल-रहमान अल-मगरेबी म्हणूनही ओळखले जाते. अब्बते इराणमध्ये असल्याचा विश्वास अमेरिकेने व्यक्त केला आहे. मात्र, तो सध्या कुठे आहे, याबाबत स्पष्ट माहिती नाही.

Al-Zawahiri
गण गण गणात बोतेच्या गजराने भक्तीमय झाली जानेफळ नगरी

अल कायदाने अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या

अब्बते हा मोरोक्कनमध्ये जन्मलेला दहशतवादी अल-जवाहिरीचा जावई आहे. अल कायदा संघटनेने अमेरिकेत अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या आहेत. अफगाणिस्तानात जाण्यापूर्वी अब्बतेने जर्मनीमध्ये सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचा अभ्यास केला. अफगाणिस्तानात गेल्यानंतर प्राथमिक माध्यम शाखेच्या व्यवस्थापनावर देखरेख करण्यासाठी त्याची नियुक्ती करण्यात आली. अमेरिकेत 11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवादी घटनांनंतर मोहम्मद अब्बते इराणला पळून गेला. असे मानले जाते की तो सध्या इराणमध्ये आहे मात्र याबाबद कोणालाही स्पष्ट माहिती नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com