प्राणाची बाजी लावलेल्या अग्निवीरास एक कोटी रुपयांची भरपाई; सैनिकांप्रमाणेच मिळणार लाभ

ज्यांनी अग्निवीर विराेध आंदोलनात अथवा अन्य आंदाेलनात भाग घेतला ते या याेजनेचा भाग होणार नाहीत असे पुरी यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.
प्राणाची बाजी लावलेल्या अग्निवीरास एक कोटी रुपयांची भरपाई; सैनिकांप्रमाणेच मिळणार लाभ
'Agneepath' scheme, Lt. General Anil Puri, Vice Admiral Dinesh Tripathi, Air Marshal Suraj Jha saam tv

नवी दिल्ली : 'अग्निपथ' योजनेच्या (Agneepath Scheme) विरोधात युवा वर्गाकडून देशातील विविध राज्यात अग्नीतांडव आंदाेलन छेडण्यात आले. आजही बहुतांश राज्यात युवा वर्गाकडून हिंसक निदर्शने सुरु आहेत. दरम्यान या याेजनेबाबत युवा वर्गाच्या मनात तसेच देशातील जनतेत झालेले गैरसमज दूर करण्यासाठी लष्कराच्या तिन्ही दलांनी संयुक्तिरित्या पत्रकार परिषद घेतली. ज्यांनी आंदोलनात भाग घेतला ते अग्निपथचा भाग होणार नाहीत असे पुरी यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. युवकांनी आंदोलनात भाग घेतला नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार असे लष्करातील अतिरिक्त सचिव लेफ्टिनेंट जनरल अनिल पुरी (Lt. Gen. Anil Puri) यांनी नमूद केले. लष्कर (indian army), नौदल (indian navy) आणि हवाई दलातील (indian air force) भरती प्रक्रियेबाबत त्यांच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेबाबत गेली दोन वर्ष अभ्यास करण्यात आला. त्यातूनच युवा वर्गाचा आणि लष्कराचा फायदा या दाेन्ही दृष्टीकोनातून ही योजना पुढं आल्याचे पुरी यांनी नमूद केले.

पुरी म्हणाले युवकांना 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात भडकावण्यात आले. कोचिंग क्लास चालकांनी युवकांना भडकाविल्याचे पुरी यांनी नमूद केले. ते म्हणले भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला शपथपत्र द्यावे लागेल. त्यामध्ये आपण कोणत्याही निदर्शनात भाग घेतला नाही, माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही असे नमूद करावे लागेल.

'Agneepath' scheme, Lt. General Anil Puri, Vice Admiral Dinesh Tripathi, Air Marshal Suraj Jha
उदघाटनापुर्वी पंतप्रधान नरेंद्र माेदींनी बाेगद्यातील उचलला कचरा (व्हिडिओ पाहा)

पुरी म्हणाले युवकांनी इकडे- तिकडे भटकणापेक्षा वेळ वाया न घालवता परीक्षेसाठी तयारी करावी. कोणासाठीही शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणे इतके सोपे नाही. त्यामुळे युवकांनी परीक्षेवर पूर्ण लक्ष केंद्रीत करावे. सर्व अग्निवीरांना सामान्य सैनिकांसारखा लाभ मिळेल असेही पुरी यांनी स्पष्ट केले. याबराेबरच सध्याच्या तुलनेत अग्निवीरांना अधिक भत्ते आणि सुविधा दिल्या जाणार आहेत असेही नमूद केले.

'Agneepath' scheme, Lt. General Anil Puri, Vice Admiral Dinesh Tripathi, Air Marshal Suraj Jha
शरद पवारांनंतर राष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यास संधी; दिल्लीत बैठक सुरु

देशाच्या सेवा करताना एखादा अग्निवीरास प्राणाची आहुती द्यावी लागली तर त्यास एक कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. जे युवक 'अग्निवीर' म्हणून कार्यरत राहतील त्यांना सियाचीन येथे नियुक्त केले असेल तर सध्याच्या सैनिकांना जितका भत्ता आणि सुविधा दिल्या जातात त्याच सुविधा अग्नीवीराला मिळणार आहेत. त्यात काेणताही दुजाभाव केला गेला नसल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

'Agneepath' scheme, Lt. General Anil Puri, Vice Admiral Dinesh Tripathi, Air Marshal Suraj Jha
आळंदीस निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनाचा झाला भीषण अपघात; एक ठार, 28 जखमी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com