'अग्निपथ' योजनेबद्दल खोट्या बातम्या पसरवणारे WhatsApp ग्रुप ब्लॉक करण्याच्या सूचना

ही योजना जाहीर झाल्यापासून देशात आंदोलन सुरू झाले आहे.
'अग्निपथ' योजनेबद्दल खोट्या बातम्या पसरवणारे WhatsApp ग्रुप ब्लॉक करण्याच्या सूचना
NarendraModi government's Agnipath schemeSaam TV

नवी दिल्ली: देशभरात अग्निपथ योजनेला विरोध होत असताना केंद्र सरकारने कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या व्हॉट्सअॅप (WhataApp) ग्रुप्स ब्लॉक केले असल्याची माहिती समोर आली आहे, असे एकूण ३५ व्हॉट्सअॅप ग्रुप होते. जे या योजनेबाबत चुकीची माहिती पसरवत होते. हे सर्व ब्लॉक करण्यात आले आहेत. मात्र, या ग्रुपवर तातडीने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. या योजनेची घोषणा झाल्यापासून देशातील विविध राज्यांमध्ये याविरोधात आंदोलने सुरू झाली होती.

NarendraModi government's Agnipath scheme
प्राणाची बाजी लावलेल्या अग्निवीरास एक कोटी रुपयांची भरपाई; सैनिकांप्रमाणेच मिळणार लाभ

बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये या योजनेचा विरोध होत आहे. बिहारमध्ये या योजनेबाबत अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली. या योजनेमुळे संतप्त झालेल्या तरुणांनी ट्रेनलाही आग लावली. यासोबतच भाजप (BJP) नेत्यांच्या घरांवरही हल्ले करण्यात आले.

या योजनेतील बदला बाबत केंद्र सरकारने रविवारी आपली भूमिका मांडली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. यानंतर तिन्ही दलांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन योजनेची सविस्तर माहिती दिली. अनिल पुरी यांनी केंद्राच्या योजनेची संपूर्ण ब्ल्यू प्रिंटची माहिती दिली. ही योजना परत घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दुसरे म्हणजे, अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्यांना भरतीमध्ये स्थान मिळणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

NarendraModi government's Agnipath scheme
'अग्निपथ' योजनेची भरती प्रक्रिया कधी सुरू होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

पुरी म्हणाले युवकांनी इकडे- तिकडे भटकणापेक्षा वेळ वाया न घालवता परीक्षेसाठी तयारी करावी. कोणासाठीही शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणे इतके सोपे नाही. त्यामुळे युवकांनी परीक्षेवर पूर्ण लक्ष केंद्रीत करावे. सर्व अग्निवीरांना सामान्य सैनिकांसारखा लाभ मिळेल असेही पुरी यांनी स्पष्ट केले. याबराेबरच सध्याच्या तुलनेत अग्निवीरांना (Agnipath) अधिक भत्ते आणि सुविधा दिल्या जाणार आहेत असेही नमूद केले.

देशाच्या सेवा करताना एखादा अग्निवीरास प्राणाची आहुती द्यावी लागली तर त्यास एक कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. जे युवक 'अग्निवीर' म्हणून कार्यरत राहतील त्यांना सियाचीन येथे नियुक्त केले असेल तर सध्याच्या सैनिकांना जितका भत्ता आणि सुविधा दिल्या जातात त्याच सुविधा अग्नीवीराला मिळणार आहेत. त्यात काेणताही दुजाभाव केला गेला नसल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com