'अग्निपथ' योजनेची भरती प्रक्रिया कधी सुरू होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

अग्निवीरांची पहिली तुकडी डिसेंबर २०२२ पर्यंत रेजिमेंटमध्ये सामील होईल.
Indian Army
Indian ArmySaam Tv

नवी दिल्ली: केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'अग्निपथ' योजनेमुळे (Agnipath Scheme) देशात संतपाचे वातावरण पसरले आहे. या योजनेविरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलकांनी निदर्शने (Agnipath protest) केली आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने योजनेत अनेक बदल केले आहेत. आज रविवारी या संदर्भात तिनही दलांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अग्निपथ योजने संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. यात या योजनेतून होणाऱ्या लष्कर, नौदल आणि हवाई दलातील भरती प्रक्रियेबाबतही माहिती देण्यात आली आहे.

अग्निवीरांची पहिली तुकडी डिसेंबर २०२२ पर्यंत आमच्या रेजिमेंटमध्ये सामील होईल आणि त्यांना पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत तैनातीसाठी उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी दिली. आता वायुसेनेनेही अग्निवीरांच्या भरतीची घोषणा केली आहे.

Indian Army
दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाला आग; थरारक व्हिडिओ

अशी असणार भरती प्रक्रिया

अग्निपथ योजनेच्या विरोधाला न जुमानता सरकारने दोन दिवसात अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जारी करणार आहे. या योजनेअंतर्गत २४ जूनपासून भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. आज पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात लेफ्टनंट जनरल अनिल पुरी, एअर मार्शल एसके झा यांनी भरती प्रक्रियेची माहिती दिली.

अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिसूचना http://joinindianarmy.nic.in वर जारी केली जाईल. पहिल्या टप्प्यातील परीक्षा २४ जुलै रोजी होणार आहे. डिसेंबरपूर्वी हवाई दलात पहिली तुकडी भरती होईल. त्यानंतर अग्निवीरांचे प्रशिक्षण ३० डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

Indian Army
शरद पवारांनंतर राष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यास संधी; दिल्लीत बैठक सुरु

नौदलात भरती होणाऱ्या इच्छूक अग्निवीरांसाठी २५ जून रोजी जाहिरात प्रकाशित होणार आहे. नौदला भरती होण्याची इच्छा असणाऱ्या अग्निवीरांची भरती प्रक्रिया महिनाभरात सुरू होणार आहे. पहिल्या बॅचचे अग्निवीर २१ नोव्हेंबरपासून रिपोर्टिंग सुरू करतील, असं नौदलाने म्हटले आहे.

भारतीय सैन्यात (Indian Army) अग्निवीरांच्या भरतीसाठी १ जुलै रोजी अधिसूचना जारी केली जाईल. अग्निवीरांच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होईल, ही प्रक्रिया ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. लष्करातील अग्निवीरांची पहिली तुकडी डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दाखल होईल, अशी माहिती लष्कर अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com