ताजमहालमध्ये नमाज कधीपासून होत आहे? RTI वर ASI चे धक्कादायक उत्तर

यामुळे आता पुन्हा एकदा ताजमहालमध्ये नमाज पठणावरून वाद निर्माण होऊ शकतो.
Taj Mahal controversy News updates in Marathi
Taj Mahal controversy News updates in MarathiSaam TV

आग्रा: येथील ताजमहालवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर एका इतिहासकाराने नमाजबाबत आरटीआय दाखल केला होता, ज्याला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने उत्तर दिले आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ताजमहालमध्ये नमाज पठणावरून वाद निर्माण होऊ शकतो. हे आरटीआय इतिहासकार राजकिशोर राजे यांनी दाखल केले होते. (Taj Mahal controversy News updates in Marathi)

इतिहासकार राजकिशोर राजे म्हणतात की, शाहजहानच्या काळातील कोणत्याही धर्मग्रंथात नमाजचा उल्लेख नाही. शहाजहानच्या काळात ताजमहालमध्ये सामान्य लोकांना येण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे त्या वेळी ताजमहालमध्ये नमाज अदा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

इतिहास अभ्यासक राजकिशोर राजे पुढे म्हणाले की, कोणत्याही ऐतिहासिक स्थळावर कोणतेही धार्मिक कार्य होऊ नये. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ताजमहालमध्ये नमाज अदा करणाऱ्या चार पर्यटकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. यातील तीन हैदराबादचे तर एक आझमगड येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्यांच्यावर एफआयआरही नोंदवला होता.

हे देखील पाहा -

ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या चार पर्यटकांनी संध्याकाळी शाही मशिदीत नमाज अदा केली. यावर तेथे तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनी चार पर्यटकांना ताब्यात घेतले होते. आरोपी पर्यटकांनी सांगितले की ते सर्व अभ्यास करतात, ताजमहालमध्ये नमाज अदा करण्यास मनाई आहे हे त्यांना अजिबात माहित नव्हते.

Taj Mahal controversy News updates in Marathi
एका मुलाचा मृत्यू अन् अंत्यसंस्कार दोघांवर; पुण्यातल्या घटनेने खळबळ

याच्या एक दिवस आधी भगवा परिधान करून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या ओराईच्या संताने परिसरात एकच खळबळ उडवून दिली होती. घटनास्थळी सीआयएसएफ अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. प्रकरण वाढत असल्याचे पाहून एएसआयचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी संत मत्स्येंद्र गोस्वामी सांगतात की, ताजमहाल परिसरात शौचालयाजवळ देवांचे फोटो लावण्यात आले आहे. ही फोटो तेथून हटवावीत, अशी मागणी संताने केली.

जर त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर ते ताजमहालसमोर आमरण उपोषण करतील. हे प्रकरण हाताळण्यासाठी ASI अधिकाऱ्यांनी संत मत्स्येंद्रन गोस्वामी यांना आश्वासन देऊन ताजमहालपासून दूर पाठवले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com