Jignesh Mevani News : आमदार जिग्नेश मेवानींना ६ महिन्यांची शिक्षा, तीन वेगवेगळ्या प्रकरणांत तीन वेगवेगळ्या शिक्षा

आमदार जिग्नेश मेवानी यांना शुक्रवारी अहमदाबादच्या कनिष्ठ न्यायालयानं सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
jignesh mevani
jignesh mevani saam tv

अहमदाबाद: आमदार जिग्नेश मेवानी यांना शुक्रवारी अहमदाबादच्या कनिष्ठ न्यायालयानं सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ साली गुजरात (Gujrat) युनिव्हर्सिटीचे नाव बदलण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या तोडफोड प्रकरणात कोर्टाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. (jignesh mevani News)

jignesh mevani
चायनीज लोन अ‍ॅप्सवर ED ची मोठी कारवाई; Paytm सह अनेक कंपन्यांना दणका

काँग्रेसचे नेते आणि आमदार जिग्नेश मेवानी (Jignesh Mevani) यांच्यासह एकूण २० आरोपी दोषी आढळले आहेत. कोर्टाने (Court) या प्रकरणात तीन वेगवेगळ्या प्रकरणात शिक्षा सुनावल्या आहेत. या तीनपैकी एका प्रकरणात सहा महिन्यांचा तुरुंगवास, अन्य प्रकरणात ५०० रुपये आणि तिसऱ्या प्रकरणात १०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरात युनिव्हर्सिटीच्या कायदा विभागाचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ठेवण्यात यावे, या मागणीसाठी जिग्नेश मेवानी यांनी आंदोलन केले होते. त्यात जिग्नेश यांच्यासह १९ जणांनीही भाग घेतला होता. जिग्नेश मेवानींना दुसऱ्यांदा कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. याआधी मेहसानामध्ये विनापरवानगी रॅली काढल्याप्रकरणी तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

jignesh mevani
बँकेचा मोठा निष्काळजीपणा; खोक्यात नोटा ठेवल्या; पाणी शिरल्याने 42 लाखांचा झाला लगदा

काँग्रेस नेत्यासह २० जणांना शिक्षा

अहमदाबाद मेट्रोपॉलिटिन मॅजिस्ट्रेट कोर्टाने युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये तोडफोड केल्याप्रकरणात एकूण २० जणांना दोषी ठरवलं आहे. त्यात आमदार जिग्नेश मेवानी यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोर्टाने तीन वेगवेगळ्या प्रकरणांत तीन वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या आहेत. एका प्रकरणात सहा महिन्यांचा तुरुंगवास, दुसऱ्या प्रकरणात ५०० रुपये आणि अन्य एका प्रकरणात १०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com