मोमोज खाताय , सावधान ! AIIMS च्या तज्ज्ञांनी दिला 'हा' इशारा

तुम्ही अनेकदा रस्त्यावर मोमोज (momos) आवडीने खाल्ले असतील. मात्र, मोमोज आवडीने खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे.
मोमोज खाताय , सावधान !  AIIMS च्या तज्ज्ञांनी दिला 'हा' इशारा
Momos Saam Tv

नवी दिल्ली : तुम्ही अनेकदा रस्त्यावर मोमोज आवडीने खाल्ले असतील. मात्र, मोमोज आवडीने खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. काही दिवसांपूर्वी मोमोज (Momos) खाल्यांमुळे दिल्लीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) तज्ज्ञांनी मोमोज न चावता खाऊ नका, असा सल्ला दिला आहे. (Momos fast food News In Marathi )

Momos
मिक्सरची काळजी कशी घेता येईल ?

एम्सने सांगितले की, दिल्लीमधील (Delhi) ५० वर्षीय व्यक्तीची मोमोज खाल्यामुळे मृत्यू झाला. या व्यक्तीच्या श्वसननलिकेत मोमोज अडकल्याने व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले आहे. तसेच मोमोजच्या श्वास गुदमरून आणि न्यूरोजेनिक कार्डिअॅक अरेस्ट यामुळेही त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. एम्सच्या तज्ञ्जांनी म्हटले आहे की, त्यामुळे पुढच्या वेळेस मोमोज किंवा इतर कोणताही खाद्यपदार्थ खात असताना, योग्य पद्धतीने चावून खा तसेच खात असताना योग्य पद्धतीने पाणी प्याला हवं, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Momos
अॅल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न स्टोअर करणे ठरते धोकादायक

मोमोज का आहे आरोग्यासाठी घातक ?

मोमोज तयार करण्यासाठी मैदा वापरला जातो. हा मैदा व्यक्तीच्या स्वादुपिंडाला घातक आहे. मोमोज तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भाज्या आणि चिकन दिर्घकाळ ठेवल्या जातात. त्यामुळे तशाच दिर्घकाळ ठेवलेल्याने खराब झालेल्या भाज्या आणि चिकन वापरून तयार केलेले मोमोज खाणे हानिकारक असते. मोमोज विक्रेते स्वस्त दरातील लाल तिखट पावडर वापरतात. त्यामुळे असे मोमोज आरोग्यासाठी हानिकारक असतात. असे मोमोज खाल्यामुळे मुळव्याध सारखे आजार होऊ शकतात. या मोमोजमध्ये मोनो-सोडियम ग्लूटामेट टाकले जाते. सोडियम ग्लूटामेट पांढऱ्या क्रिस्टर पावडर सारखी असते. या पावडरमुळे लठ्ठपणा होण्याला कारणीभूत ठरतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com