आम्ही दोन लग्ने केली तरी, पत्नींचा आदर करतो, पण हिंदू...; MIM नेत्याच्या वक्तव्याने नवा वाद

हिंदू विवाह पद्धती आणि हिजाब वादावर एमआयएमचे नेते शौकत अली यांनी विधान करून नवा वाद निर्माण केला आहे.
MIM Leader Shaukat Ali Statement/Social Media
MIM Leader Shaukat Ali Statement/Social MediaSAAM TV

MIM Leader Shaukat Ali Statement : उत्तर प्रदेशचे एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली (Shaukat Ali) यांनी हिंदू विवाह पद्धतीवर भाष्य करताना नवा वाद ओढवून घेतला आहे.

आम्ही तीन-तीन विवाह करतो असे लोक म्हणतात. आम्ही दोन लग्ने करतो, पण आमच्या पत्नींचा आदर करतो. मात्र, तुम्ही (हिंदू) एकीची लग्न करता आणि तीन-तीन प्रेयसी असतात. तुम्ही ना पत्नीचा, ना प्रेयसींचा आदर करता, असं शौकत अली म्हणाले.

MIM Leader Shaukat Ali Statement/Social Media
Supreme court: हिजाब प्रकरणी अंतिम निर्णय नाहीच; सुप्रीम कोर्टाच्याच मोठ्या खंडपीठाकडे वर्ग

हिजाब वादावरही शौकत अली यांनी भाष्य केले. या देशात कोण काय परिधान करेल, हे संविधान ठरवेल. भाजप असे मुद्दे घेऊन देशात फूट पाडण्याचे काम करत आहे, असा आरोपही अली यांनी केला. शौकत अली यांनी यावेळी भाजपवर (BJP) निशाणा साधला.

MIM Leader Shaukat Ali Statement/Social Media
महिला पत्रकाराचा हिजाब घालण्यास नकार; इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी मुलाखत देणं टाळलं

भाजप कमकुवत झाली की ते मुस्लीम समाजाशी संबंधित मुद्दे उकरून काढतो, असे ते म्हणाले. भाजप घाणेरडे राजकारण करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. (Latest Marathi News)

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचे नीकटवर्तीय म्हणून शौकत अली यांना ओळखले जाते. उत्तर प्रदेश निवडणुकीदरम्यान शौकत अली यांची अनेक वक्तव्ये चर्चेचा विषय ठरली होती. हिजाब वादावर असदुद्दीन ओवैसी यांनीही सवाल उपस्थित केले आहेत.

शीख समाजातील व्यक्ती पगडी परिधान करू शकते, एक हिंदू महिला मंगळसूत्र आणि कुंकू लावू शकते, तर मुस्लीम मुलींना हिजाब परिधान करण्यापासून का रोखले जाते, असा सवाल त्यांनी केला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com