Air India Aircraft: एअर इंडियाचं विमान पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं...; पुढे काय घडलं?

Air India Aircraft: नंतर विमानाने लगेचच युटर्न घेतला आणि मोठा अनर्थ होतहोता टळला.
Air India Aircraft
Air India AircraftSaam TV

Pakistan Airspace:

लंडनला जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानाबाबत एक मोठी घटना घडली आहे. दिल्लीहून निघालेलं हे विमान काही वेळ उडता उडता भरकटले आणि पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरले, नंतर विमानाने लगेचच युटर्न घेतला आणि मोठा अनर्थ होतहोता टळला. (Latest Marathi News)

Air India Aircraft
Financial Planning Tips : नुकतेच लग्न झालेय, नोकरीला लागलात? असे करा आर्थिक नियोजन, पैशांची चणचण कधीच भासणार नाही

विमानाने माघार घेतल्यावर पुन्हा दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरवण्यात आलं. विमान दिल्लीला लँड झाल्याने सर्व प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. तांत्रिक बिघाड झाल्याने विमान उतरवले असल्याचे समजताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

गुरुवारी सकाळी ७.१५ वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बोईंग 787-8 ड्रीमलाइनर फ्लाइट क्रमांक AI0111 या विमानाने उड्डाण घेतली. उड्डाण घेतल्यावर पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश केल्याने दिल्लीत तातडीने यूटर्न घेत लँडींग केलं आहे. ३६ हजार फूट उंचावरून या विमानाने यूटर्न घेतला.

या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने आपल्या x ट्वीटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. एअर इंडियाच्या खराब सेवेमुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. विमानात तांत्रिक बिघाड आणि एसीच्या समस्येला सामोरे जावे लागले. यावेळी वैमानिक हवेत प्रयोग करत होता,असे आरोप प्रवाशाने ट्वीटकरत केलेत.

Air India Aircraft
Jio Recharge Plan : जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर! 19 रुपयांत मिळणार 1.5 GB डेटा, आजचा करा रिचार्ज

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com