Air India Flight: दिल्लीवरुन सिडनीला जाणाऱ्या विमानात मोठी दुर्घटना, 7 प्रवासी जखमी; नेमकं काय घडलं?

Latest News: सिडनी विमानतळावर जखमी प्रवाशांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले.
Air India flight
Air India flightsaam tv

Delhi News: दिल्लीवरुन ऑस्ट्रेलियातल्या सिडनीला (Delhi Sydney Flight) जाणाऱ्या विमानामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उड्डाण घेतलेल्या या विमानाला खराब हवामानामुळे (Bad Weather) अचानक धक्के बसले. त्यामुळे या विमानातून प्रवास करणारे सात प्रवासी जखमी झाले. या विमानातून 224 जण प्रवास करत होते. इतर सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

Air India flight
India Monsoon Update: शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी! मान्सूनबाबत भारतीय हवामान खात्याकडून मोठी अपडेट

एएनआय वृत्तसंस्थेने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे B787-800 विमान मंगळवारी दिल्लीहून सिडनीला निघाले होते. सिडनीजवळ पोहचताच खराब हवामानामुळे विमानाला धक्के बसले. यामध्ये सात प्रवासी जखमी झाले. सिडनी विमानतळावर जखमी प्रवाशांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. एकाही प्रवाशाला रुग्णालयात दाखल करावे लागले नाही.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सांगितले की, उड्डाणाच्या वेळी हवेच्या प्रवाहात अचानक बदल झाल्यामुळे विमानाला जे धक्के बसतात त्याला टर्ब्युलन्स (turbulence) म्हणतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाला धक्के बसल्यामुळे सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. एअर इंडियाच्या केबिन क्रूने ऑन-बोर्ड डॉक्टर आणि नर्सच्या मदतीने जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचार दिले.

Air India flight
NIA Raid: NIA ची मोठी कारवाई, देशातील 6 राज्यांमध्ये 100 ठिकाणी छापेमारी

एअर इंडियाकडून सांगण्यात आले की, विमानात 224 प्रवासी होते. एअर टर्ब्युलन्समुळे काही प्रवासी जखमी झाले. विमान सिडनीत सुरक्षित उतरवण्यात आले. यात 7 प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

मागच्या वर्षी मे महिन्यात अशीच एक घटना घडली होती. जेव्हा मुंबई-दुर्गापूर स्पाईसजेटच्या विमानाला लँडिंगदरम्यान टर्ब्युलन्स आल्याने 12 प्रवासी जखमी झाले होते. जखमी झालेल्या प्रवाशांपैकी एकाचा काही महिन्यांनंतर मृत्यू झाला. अकबर अन्सारी (48 वर्षे) असे या प्रवाशाचे नाव होते. तसंच, यूएसमध्ये एका खासगी जेटला न्यू इंग्लंडमध्ये तीव्र टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला होता. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com