अमेरिकेत थेट घरावर कोसळलं विमान; अंगावर काटा आणणारा Video पाहा

आकाशातून चाललेल्या एका विमानाला अचानक आग लागल्यामुळे ते घरावर कोसळून मोठी हानी झाल्याची घटना अमेरीकेत घडली आहे.
अमेरिकेत थेट घरावर कोसळलं विमान; अंगावर काटा आणणारा Video पाहा
अमेरिकेत थेट घरावर कोसळलं विमान; अंगावर काटा आणणारा Video पाहाSaam TV

कॅलिफोर्निया: आकाशातून चाललेल्या एका विमानाला अचानक आग लागल्यामुळे ते घरावर कोसळून मोठी हानी झाल्याची घटना अमेरीकेत घडली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात सोमवारी झालेल्या भीषण अपघातात एक विमान निवासी भागात कोसळलं आहे. एका घरावर हे पेटतं विमान कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत दोन जण ठार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

...असा झाला अपघात

अमेरिकेतील कॅलिफोर्निया भागात दोन इंजिन असणारं विमान पडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. निवासी भागात हे विमान कोसळलं. याच भागात एक शाळादेखील आहे. घटनास्थळा जवळील शाळेच्या इमारतीचंही यात नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. विमानाला दोन इंजिनं होती, परंतु दुसऱ्या इंजिनाचा काहीही उपयोग चालकाला करता आला नाही. विमानाला आग लागल्यामुळे विमान जमिनीवर कोसळलं आणि जोरदार आवाज झाला.

अमेरिकेत थेट घरावर कोसळलं विमान; अंगावर काटा आणणारा Video पाहा
खूशखबर! आता LPG सिलेंडर मिळणार 634 रुपयांना; कसा ते जाणून घ्या

रिपोर्टमधील दाव्यानुसार, सेसना 340 नावाच्या या विमानातून 6 प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात. या विमाानानं ऍरिझोनावरून उड्डाण केलं होतं, त्यानंतर काही मिनिटांतच विमानाला आग लागली आणि ते खाली कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतर घरांनाही आग लागली. अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Related Stories

No stories found.