मुलीचे मैत्रीणीवरच जडले प्रेम..लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहण्यासाठी गेले घरातून पळून

मुलीचे मैत्रीणीवरच जडले प्रेम..लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहण्यासाठी गेले घरातून पळून
मुलीचे मैत्रीणीवरच जडले प्रेम..लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहण्यासाठी गेले घरातून पळून
live in relationshipSaam tv

अजमेरमध्ये राहणाऱ्या दोन्ही मुली 2 महिन्यांपासून घरातून बेपत्ता होत्या. त्‍यांना उदयपूरमध्ये झाडोल पोलिसांनी दोन तरुणींना उदयपूर न्यायालयात हजर केले. जिथे दोघांनी सांगितले की, ते एकमेकांवर प्रेम करतात आणि लग्न करून पती-पत्नीसारखे राहायचे आहे. (ajmer news Girl's love for her girlfriend went home to live in a live in relationship)

live in relationship
शिंदेच्‍या गटात जळगावातील आमदार; जिल्‍ह्यातील शिवसेनेत फुट

राजस्थानातील (Rajasthan) उदयपूरमध्ये मंगळवारी झाडोल पोलिस स्टेशनने दोन तरुणींना उदयपूर कोर्टात हजर केले. अजमेरहून उदयपूरला पळून गेलेल्या दोन मुलींनी कोर्टात सांगितले की, आम्ही दोघी एकमेकांवर प्रेम करतो आणि लग्न (Marriage) करून पती-पत्नीसारखे जगू इच्छितो. त्यानंतर तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. पोलिसांनी (Police) न्यायालयात सांगितले की, दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. त्यांच्या बेपत्ता असल्‍याची अजमेरमध्ये नोंद झाल्यानंतर वॉरंट जारी करण्यात आले. त्याचवेळी दोन्ही मुलींनी कोर्टात आपले म्हणणे मांडले. त्यानंतर त्यांना नारी निकेतन येथे पाठवण्यात आले. आज या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या आवारात पोहोचलेल्या नातेवाईकांनी बराच वेळ दोन्ही मुलींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी त्यांना अजमेरहून उदयपूरला जाण्यास सांगितले. मात्र त्यांनी जाण्यास नकार दिला.

अभ्‍यासादरम्‍यान झाली मैत्री

त्याचवेळी झाडोल पोलिस स्टेशनचे एएसआय हिम्मत सिंह यांनी सांगितले की, हावडा अजमेरमध्ये राहणाऱ्या दोन्ही मुली एकाच समाजातील असून त्यांच्या अभ्यासादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली होती. त्‍यातील एक मुलगी कॉलेजमध्ये प्रथम वर्षाची तर दुसरी बारावीची विद्यार्थिनी आहे. त्यापैकी एक 21 वर्षांची आहे आणि दुसरी 20 वर्षांची आहे. दोन्ही मुली अडीच महिन्यांपूर्वी घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्याचवेळी दोघीही प्रौढ असल्याने पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याने मुलींचा शोध घेत कुटुंबीयांनीच उदयपूर जिल्ह्यातील झाडोल शहर गाठले.

3 वर्षांपासून आहेत मैत्रिणी

कोर्टात झालेल्‍या सुनावणीत मुलींनी सांगितले, की गेल्या तीन वर्षांपासून त्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांना इतर कोणाशीही लग्न करायचे नाही. त्यांना एकमेकांचा लाईफ पार्टनर व्हायचे असून त्याचे समलैंगिक संबंध कुटुंब आणि समाज कधीही स्वीकारू शकत नाहीत, यामुळे त्याने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com