Ayman al-Zawahiri: अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल्- कायदाचा नेता अयमान अल्-जवाहिरी ठार

अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सीआयएने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवादविरोधी मोहीम राबवली होती.
Ayman al-Zawahiri Killed
Ayman al-Zawahiri KilledSaam TV

Ayman al-Zawahiri Killed: अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने अल्-कायदाचा नेता अयमान अल्-जवाहिरीला याला एका ड्रोन हल्ल्यात ठार केलं आहे. अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सीआयएने (CIA) अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुलमध्ये दहशतवादविरोधी मोहीम राबवली होती.

या मोहिमेमध्ये सीआयएने केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये त्याचा जवाहिरीचा मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी दिली आहे. बायडेन यांनी म्हटलं आहे की, 'अमेरिकेच्या नागरिकांची हत्या आणि हिंसा करणारा आतंकवादी नेता आता राहिला नाही. आता त्या पीडितांना न्याय मिळाला आहे.'

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवाहिरी आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये असताना त्याच्यावरती एक मिसाईल डागण्यात आली त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष जो बाईडन यांनी आपल्या ट्विटद्वारे दिली आहे. रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवादविरोधी मोहीम राबवली होती. याच मोहिमेमध्ये जवाहिरीचा मृत्यू झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com