सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मोदींची फक्त तीन मिनिटांची उपस्थिती

आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत केवळ शेवटची तीन मिनिटे उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अन्य पक्षाच्या नेत्यांचा अपमान केल्याची भावना निर्माण झाली आहे
सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मोदींची फक्त तीन मिनिटांची उपस्थिती
नरेंद्र मोदी- Saam Tv

नवी दिल्ली : आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत All Party Meeting केवळ शेवटची तीन मिनिटे उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi अन्य पक्षाच्या नेत्यांचा अपमान केल्याची भावना निर्माण झाली असून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. All Party Leaders unhappy over Pm Narendra Modi

संसदेच्या अधिवेशनाच्या Parliament Session पार्श्वभूमीवर मोदी यांनी ही बैठक बोलावली होती. संसदेच्या ग्रंथालय Library परिसरात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्वपक्षीय बैठकीला ३३ पक्षांतील ४० नेते उपस्थित होते आणि कोणत्या विषयांवर चर्चा केली जावी याचा सल्ला विरोधी पक्षांनी यावेळी दिला. पंतप्रधान बैठकीत म्हणाले की सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे आणि सर्व सूचना स्वागतार्ह आहेत, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी Pralhad Joshi यांनी दिली आहे.

मात्र, स्वतः पंतप्रधान बैठकीला शेवटची तीन मिनिटे उपस्थित राहिल्याबद्दल बैठकीतच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नापसंती व्यक्त केली. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, तृणमूल काँग्रेसचे नेते-खासदार डेरेक ओब्रायन यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पार पडली. All Party Leaders unhappy over Pm Narendra Modi

नरेंद्र मोदी
पाच सदस्यीय समिती करणार 10च्या निकालाच्या क्रॅश वेबसाईटची चौकशी

सर्व राजकीय पक्षांच्या भावना समजून घेण्यासाठी पंतप्रधानांनी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे म्हणणे बैठकीनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मांडले. देशातील कोव्हीड परिस्थिती, शेतकऱ्यांचे आंदोलन आणि वाढती महागाई या विषयांवर आपल्याला चर्चा हवी आहे, सरकारने या मुद्यांपासून पळ काढू नये, अशी भूमिका विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीत व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com