यूपी पोलिसांनी प्रियंका गांधींना नजरकैद केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया...

प्रियंका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की केल्याचा निषेध करत कॉंग्रेस नेत्यांनी कडक शब्दांत प्रतिक्रीया दिल्या आहेत.
यूपी पोलिसांनी प्रियंका गांधींना नजरकैद केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया...
यूपी पोलिसांनी प्रियंका गांधींना नजरकैद केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया...twitter/@INCIndia

लखनऊ: कॉंग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी (Congress MP Priyanka Gandhi) यांचा यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून (Uttar Pradesh Police) धक्काबुक्की केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. यावेळी त्यांना रोखण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा हात मुरडला (grabbed Hand) आणि कपडेही ओढले (pulled her clothes) असा आरोप करत उत्तर प्रदेश कॉंग्रेसने याबाबतचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. प्रियंका गांधींना धक्काबुक्की करत अडवल्याप्रकरणी देशभरातून विविध प्रतिक्रीया येत आहेत. (Reactions of Congress leaders regarding the detention of Priyanka Gandhi by the UP police ...)

हे देखील पहा -

उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यात झालेल्या संघर्षामुळे काही शेकतऱ्यांचा मृत्यू झाला आहे. प्रियंका गांधी या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आणि मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होत्या, मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना लखनऊमध्येच रोखलं आणि घरात नजरकैद केलं.

त्यानंतर त्या पायी चालत घराबाहेर निघाल्या आणि नंतर कारने प्रवास करु लागल्या. तेव्हा लखनौहून लखीमपूर खेरीच्या मार्गावर टोल प्लाझावर पोलिसांचा बंदोबस्त असून प्रियंका गांधी, कॉंग्रेस कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधींना रोखण्यासाठी यूपी पोलिसांनी ट्रक उभे करत रस्ता ब्लॉक केल्याचा आरोप यूपी कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेस नेत्यांनी या प्रकाराचा निषेध करत कडक शब्दांत प्रतिक्रीया दिल्या आहेत.

याबाबत प्रियंका गांधी यांचे भाऊ राहुल गांधी म्हणाले की, "प्रियंका, मला माहीत आहे की तू मागे हटणार नाहीस - ते तुझ्या धैर्याने चकित झाले आहेत. न्यायासाठीच्या या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करू."

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले की, ''एक नागरिक म्हणून मला वाटते की सीटिंग जजच्या समितीने न्यायालयीन चौकशी केली पाहिजे. त्याआधी, केंद्रीय मंत्र्याला चौकशी दरम्यान कमीत-कमी बरखास्त किंवा निलंबित केले पाहिजे कारण ही घटना त्यांच्या ताफ्याच्या संदर्भात घडली आहे.''

याबाबत कॉंग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले की, ''काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीजींना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा जाहीर निषेध! उत्तर प्रदेश मध्ये असूरराज सुरू आहे. शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले जाते, विरोधकांचा आवाज पोलिसांकडून जबरदस्तीने दाबला जातो. भाजपा लोकशाही व जनतेला पायदळी तुडवत आहे. जनतेने जागृत व्हावे''

महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हटले की, ''उत्तर प्रदेशमध्ये काय तालिबानचे सरकार आहे का? प्रियांका गांधींनी सोडलं नाही तर आम्ही महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन करू'', अशा साफ इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिला आहे.''

ज्येष्ठ वकील प्रशांत भुषण म्हणाले की, "विरोधीपक्ष नेत्यांना आदित्यनाथ यांच्या पोलिसांनी जबरदस्तीने लखीमपूर खेरीला जाण्यापासून रोखले जात आहे. प्रियांका गांधींनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली. जेथे हिंसाचार झाला आहे तेथे भाजपाचे नेते नेहमीच विरोधी राज्यांत जातात. लोकशाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आमदार जिग्णेश मेवाणी म्हणाले की, प्रियांका गांधी, दीपेंद्र हुड्डा, सलमान खुर्शीद, अखिलेश यादव यांना ताब्यात घेण्यात आले, तरीही आपण लोकशाहीची जननी आहोत का?!

डी. के. शिवकुमार म्हणाले की, "मी श्रीमती प्रियांका गांधी यांना नजरकैद केल्याप्रकरणी यूपी पोलीसांचा तीव्र निषेध करतो. आणि लखीमपूरखेरी येथे भाजपने मारलेल्या शेतकऱ्यांच्या शोकग्रस्त कुटुंबांना भेटण्यापासून रोखले, इतका उच्च माज आणि सत्तेचा गैरवापर दाखवतो की भाजपच्या प्रतिगामी मानसिकतेखाली कोणीही संरक्षित नाही." अशी संतप्त प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com