Amazon Smartphone sale
Amazon Smartphone sale Saam Tv

Great Summer Sale Amazon: ही संधी पुन्हा नाही! अ‍ॅमेझॉनवर धमाकेदार ऑफर्स, तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत खरेदी करा 5G स्मार्टफोन्स

Latest News: जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या संधीचा फायदा करुन घेऊ शकता.

New Smartphone: ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) आपल्या ग्राहकांसाठी ग्रेट समर सेल केला आहे. हा सेल 4 मेपासून सुरू झाला असून 8 मेपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये अनेक धमाकेदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. अगदी स्वस्तात तुम्ही कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करु शकता. या सेलमध्ये तुम्ही जबरदस्त फीचर्सवाले 5 जी स्मार्टफोन अगदी कमी किमतीत खरेदी करु शकता. अनेक स्मार्टफोनवर बंपर सूट देण्यात आली आहे. जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या संधीचा फायदा करुन घेऊ शकता.

अ‍ॅमेझॉनच्या (Amazon) ग्रेट समर सेलमध्ये तुम्ही जबरसदस्त डिस्काऊंट आणि उत्तम ऑफर्ससह 5G स्मार्टफोन खरेदी करु शकता. ICICI आणि Kotak बँकेच्या क्रेडिट/डेबिट कार्डवरून हे 5G मोबाईल घेतल्यावर तुम्हाला 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत देखील मिळू शकते. या लिस्टमध्ये अनेक टॉप यूजर रेट केलेले 5G स्मार्टफोन आहेत ते कोणकोणते ते आपण पाहणार आहोत...

Amazon Smartphone sale
Vivah Muhurat 2023: ऐ डीजे वाल्या गाणं वाजीव! लग्नसराई फक्त दोन महिन्यांची, जाणून घ्या शुभ मुहूर्त

iQOO Z7 5G by vivo (Norway Blue, 6GB RAM, 128GB Storage)

iQOO Z7 5G हा स्मार्टफोन टॉप रेट केलेला आणि उत्तम आहे. हा 5G स्मार्टफोन गेमिंग आणि उच्च कार्यक्षमतेसाठी देखील सर्वोत्तम मानला जातो. त्याचा 64MP OIS कॅमेरा उत्तम आहे. यामध्ये अल्ट्रा स्टेबल कॅमेरा सेजअप आहे. AI कॅमेरा मोड देखील आहेत. हा स्मार्टफोन फुल HD+ स्क्रीनसह येतो. या स्मार्टफोनचा ब्राइट आणि AMOLED डिस्प्ले अप्रतिम आहे. हा 44W फ्लॅशचार्जला देखील सपोर्ट करतो. यामध्ये तुम्हाला 128GB स्टोरेज स्पेस मिळत आहे. यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर तुम्हाला 14 टक्के सूट मिळत आहे. 21,999 चा हा स्मार्टफोन तुम्ही 18,999 रुपयात खरेदी करु शकता. बँक कार्डवर खरेदी करणार असाल तर तुम्हाला आणखी सूट मिळेल.

Amazon Smartphone sale
CBSE Board Result 2023: CBSE चा 10 वी आणि 12 वीचा निकाल पुढच्या आठवण्यात जाहीर होण्याची शक्यता, असा पाहा Result

Realme Narzo 50 Pro 5G (Hyper Blue 8GB RAM+128GB Storage)

realme Narzo 50 Pro या 5G स्मार्टफोनमध्ये 8GB RAM + 128GB स्टोरेज उपलब्ध आहे. त्याचा MediaTek Dimensity 920 प्रोसेसर देखील उत्तम गेमिंग अनुभव देतो. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसंच यामध्ये FHD+ डिस्प्ले, एक्सप्लांडेबल स्टोरेजसह लार्ज स्क्रीन साइज देखील तुम्हाला मिळेल. हा स्मार्टफोन मनोरंजनासाठी खूपच चांगला आहे. यामध्ये अँड्रॉईड 12 ची ऑपरेटिंग सिस्टम देखील देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन खूपच स्लिम, स्लीक आणि हलका आहे. या स्मार्टफोनवर 32 टक्के सूट मिळत आहे. 23,999 रुपयांचा हा स्मार्टफोन तुम्ही 18,999 रुपयांत खरेदी करु शकता. बँक कार्डवर खरेदी करणार असाल तर तुम्हाला आणखी सूट मिळेल.

Amazon Smartphone sale
Bihar Viral News: बाबो, चक्क पैशांचा पूर! कालव्यात वाहून आले नोटांचे बंडल; गोळा करायला लोकांची पळापळ

Samsung Galaxy M33 5G (Mystique Green, 6GB, 128GB Storage)

हा स्मार्टफोन अप्रतिम फीचर्ससह येतो. त्याचा मिस्टिक ग्रीन करल खूपच आकर्षक आहे. यात रॅम प्लस फीचर देखील मिळत आहे ज्यामुळे स्मार्टफोनचा रॅम बूस्ट करता येईल. व्हॉइस फोकस मोड, 6000mAh बॅटरी सह हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेट आणि फूल HD+ क्वालिटीवाल्या स्क्रीनसह हा स्मार्टफोन येते. या स्मार्टफोनचा क्वाड कॅमेरा सेटअप खूप चांगला आहे. हे 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनवर तुम्हाला तब्बल 36 टक्के सूट मिळत आहे. 24,999 रुपयांचा हा स्मार्टफोन तुम्ही फक्त 15,999 रुपयांत खरेदी करु शकता. बँक कार्डवर खरेदी करणार असाल तर तुम्हाला आणखी सूट मिळेल.

Amazon Smartphone sale
Maharashtra Weather Update : मुक्काम वाढला! आठवडाभर विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा, मुंबईत पुढच्या 3 ते 4 तासांत बसरणार सरी

Oppo A78 5G (Glowing Blue, 8GB RAM, 128 Storage)

हा स्मार्टफोन 8GB RAM सह येतो. Oppo A78 5G हा स्मार्टफोन उत्तम पर्याय मानला जातो. या स्मार्टफोनची 5000mAh बॅटरी दीर्घकाळ टिकणारी आहे. फास्ट चार्जरमुळे तुम्ही हा स्मार्टफोन कमी वेळेत चार्ज करू शकता. Oppo Glo डिझाइन, अल्ट्रा स्लिमसह हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. यामध्ये ऑक्टा कोअर प्रोसेसर देखील आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50MP AI कॅमेरा मोड देखील उपलब्ध आहे. यात 90Hz रिफ्रेश रेटसह कलर रिच डिस्प्ले देखील मिळत आहे. या स्मार्टफोनवर 14 टक्के सूट मिळत आहे. 21,999 रुपयांचा हा स्मार्टफोन तुम्ही 18,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. बँक कार्डवर खरेदी करणार असाल तर तुम्हाला आणखी सूट मिळेल.

Amazon Smartphone sale
Amboli Ghat Accident: गोव्याहून परतताना काळाचा घाला! आंबोली घाटातील दरीत कोसळून छत्तीसगडच्या पोलिसाचा मृत्यू

Tecno Spark 10 5G (Meta Blue, 8GB RAM,256GB Storage)

5G कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत. या स्मार्टफोनची 256GB स्टोरेज स्पेसही खूप भारी आहे. हा सुपर फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन जबरदस्त 5G प्रोसेसर आहे. यामध्ये स्मूथ डिस्प्ले देखील उपलब्ध आहे. तसंच रॅम प्लसची वैशिष्ट्ये आहेत.

त्याचा ग्लिटरिंग बॅक पॅनल अतिशय आकर्षक आहे. या स्मार्टफोनचा कॅमेराही मोठ्या आकारात येत आहे जो अतिशय शार्प आणि क्लिअर फोटो क्लिक करू शकतो. या स्मार्टफोनवर 12 टक्के सूट मिळत आहे. 16,999 रुपयांचा हा स्मार्टफोन तुम्हाला 14,999 रुपयांना मिळेल. बँक कार्डवर खरेदी करणार असाल तर तुम्हाला आणखी सूट मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com