अनेक सायबर हल्ल्यांमागे चीनचा डाव; अमेरिकेचा आरोप

अनेक देशांत झालेल्या सायबर ​​हल्ल्यांपाठीमागे चीनचाच डाव असल्याचे थेट आरोप अमेरिकेने केले आहे.
अनेक सायबर हल्ल्यांमागे चीनचा डाव; अमेरिकेचा आरोप
अनेक सायबर हल्ल्यांमागे चीनचा डाव; अमेरिकेचा आरोपSaam Tv

वॉशिंग्टन : अनेक देशांत झालेल्या सायबर Cyber ​​attacks हल्ल्यांपाठीमागे चीनचाच China डाव असल्याचे थेट आरोप अमेरिकेने America केले आहे. त्यांच्या या आरोपाला नाटो गटामधील देशांनी आणि ब्रिटन Britain, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व जपान Japan या देशांनी देखील याबाबत पाठिंबा दर्शविला आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाकडून सायबर हल्ले घडवून, आणले जात असल्याचे थेट आरोप Allegations यावेळी अमेरिकने केले आहे.

या सायबर हल्ल्यांमध्ये अब्जावधी डॉलरचे Dollars नुकसान देखील झाले असल्याची माहिती यावेळी अमेरिकेन दिली आहे. चीनच्या गुप्तचर सेवेच्या संपर्कामध्ये असलेले खूप हॅकर जगभरामध्ये अनेक देशांच्या संगणक यंत्रणांत घुसखोरी करत आहेत. त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या एक्सचेंज सर्व्हरवर देखील हल्ला केले आहेत.

हे देखील पहा-

हा हल्ला करण्यात आल्याचे मार्चमध्ये उघड झाले आहे, असे सायबर हल्ले करून अनेक गोपनीय आणि महत्वाची माहिती व संशोधन चोरले जात आहे. या सर्व हल्ल्यांना एकमेव चीन हा जबाबदार आहे. त्यांच्या या कृतीमुळे अर्थव्यवस्थांना व देशांच्या सुरक्षेला किती मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी यावेळी म्हटले आहे.

अनेक सायबर हल्ल्यांमागे चीनचा डाव; अमेरिकेचा आरोप
भारतला टक्कर देण्यासाठी चीनची नवी रणनीती, पाहा चीनचा 'हा' घातक डाव

स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता चीनने हॅकिंगची प्रकारांना पाठबळ दिले असल्याचे आरोप देखील त्यांनी केले आहे. व्हाइट हाउसच्या माध्यम प्रतिनिधी जेन साकी यांनी पत्रकारांना सांगितले आहे की, आमच्या चीनविषयीच्या धोरणांना जगभरामधून पाठबळ मिळत आहे. चीन पुरस्कृत सायबर हल्ल्यांने केवळ अमेरिकेचेच नाही, तर अनेक देशांचे नुकसान झाले आहे. यामुळे एकत्र येऊन त्याचा सामना करणे आवश्‍यक ठरणार आहे. त्यामुळे आता केवळ चीनवर आरोप करण्यापेक्षा त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com