धक्कादायक! अमेरिकेतील टेक्सासमध्ये सापडले ४० मृतदेह

अमेरिकेतील टेक्सासमधून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.
America News
America NewsSaam Tv

वाशिंग्टन: अमेरिकेतील (America) टेक्सासमधून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. टेक्सास येथील सॅन अंटोनिओ या भागात एका ट्रकमध्ये ४० पेक्षा जास्त मृतदेह सापडले आहेत. या मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांनी (Police) तपास सुरु केला आहे. एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ट्रेलर-ट्रॅक्टरमधून सुमारे ४० लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

दक्षिण-पश्चिम बाजूस ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये किमान ४२ लोक मृतावस्थेत आढळले आहेत, इतर १६ लोकांना वेगवेगळ्या परिस्थितीत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी पोलिस तसेच अग्निशमन गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

America News
लैंगिक अत्याचार प्रकरणात अभिनेता विजय बाबूला अटक; तीन जुलैपर्यंत होणार कसून चौकशी

या अगोदर दक्षिण आफ्रिकेतील एका नाईट क्लबमध्ये २१ विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले होते. परीक्षा संपल्यानंतर मृत मुले आनंदोत्सव साजरा करण्यासाठी क्लबमध्ये गेली होती. मृत्यू झालेल्या मुलांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नव्हत्या.

ही बातमी अमेरिकेतील एका पत्रकाराने ट्विट केली आहे. या ट्विटमध्ये काही फोटो आहेत. या फोटोमध्ये मोठ्या ट्रकच्या बाजूला काही रुग्णवाहिका तसेच पोलिसांच्या गाड्या दिसत आहेत. या घटनेमुळे भितीचे वातावरण पसरले आहे.

America News
महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे षडयंत्र; शिवसेनेचा 'सामना'तून हल्लाबोल

या घटनेत ठार झालेल्या विद्यार्थ्यांचे वय १३ ते १७ वर्षे असल्याचे सांगण्यात आले. ब्रिगेडियर थेंबिन्कोसी किनाना म्हणाले होते- 'आम्हाला माहिती मिळाली आहे की दक्षिण आफ्रिकेतील सीनरी पार्कजवळील नाईट क्लबमध्ये 21 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 8 मुली आणि 13 मुलांचे मृतदेह सापडले आहेत. क्लबच्या आतून 17 मृतदेह सापडले. उपचारादरम्यान 4 मुलांचा मृत्यू झाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com