US म्यूझिक फेस्टिव्हल दरम्यान चेंगराचेंगरीत 8 जण ठार; 11 जणांना हार्ट अटॅक

दक्षिण अमेरिकेतील ह्यूस्टन राज्यात सुरू असलेल्या अॅस्ट्रोवर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे.
US म्यूझिक फेस्टिव्हल दरम्यान चेंगराचेंगरीत 8 जण ठार; 11 जणांना हार्ट अटॅक
America: म्यूझिक फेस्टिव्हल दरम्यान चेंगराचेंगरी; 8 जण ठार, 11 जणांना हार्ट अटॅकSaam Tv

ह्युस्टन: दक्षिण अमेरिकेतील ह्यूस्टन राज्यात सुरू असलेल्या अॅस्ट्रोवर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. या अपघातात 8 जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे अशी माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध रॅपर ट्रॅव्हिस स्कॉट परफॉर्म करत असताना चेंगराचेंगरी झाली आहे. आपल्या आवडत्या रॅपरला ऐकण्यासाठी हजारो लोक आले होते त्यादरम्यान ही चेंगराचेंगरी झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यापैकी काहींचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला आहे. या अपघातात 17 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

11 जणांना हृदयविकाराचा झटका आला;
यूएस मीडियानुसार, चेंगराचेंगरीनंतर 11 जणांना हृदयविकाराचा झटका आल्याचे ह्यूस्टन अग्निशमन विभागाने सांगितले आहे. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र 8 जणांचा यात मृत्यू झाला. अमेरिकेच्या वेळेनुसार शुक्रवारी रात्री ९ ते ९.१५ च्या दरम्यान गर्दी स्टेजकडे सरकत होती. गर्दीमुळं अचानक लोक एकमेकांवर पडले आणि त्यामुळे भीती पसरली. गर्दी वाढल्याने लोक बाहेर धावले.

America: म्यूझिक फेस्टिव्हल दरम्यान चेंगराचेंगरी; 8 जण ठार, 11 जणांना हार्ट अटॅक
बहीण आणि दाजी वारंवार घरी येतात म्हणून तरुणाने केली दाजीची हत्या!

स्थानिक वृत्तसंस्थाने सांगितल्यानुसार, जमाव स्टेजकडे सरकत होता आणि समोर उभ्या असलेल्यांना दाबत होता. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. आणि लोक बाहेर पळू लागले. अपघातानंतर शो बंद करण्यात आला. रॅपर ट्रॅव्हिस स्कॉटने त्याच्या 75 मिनिटांच्या कार्यक्रमात अनेक वेळा गर्दीला स्टेजवर येण्यापासून रोखले. परंतु त्याच्या चाहत्यांनी ऐकले नाही.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.