Virginia Walmart Shooting: अमेरिकेत वॉलमार्ट स्टोरमध्ये बेछूट गोळीबार

वॉलमार्टच्या एका स्टोरमध्ये ही घटना घडली असून, गोळीबारात आतापर्यंत १० जण ठार झाल्याचे वृत्त आहे.
Virginia Walmart Shooting/News Agency
Virginia Walmart Shooting/News AgencySAAM TV

Virginia Walmart Shooting In US : अमेरिकेत बेधुंद गोळीबाराच्या घटना वारंवार घडत आहेत. अमेरिकेच्या वर्जिनिया प्रांतात अशीच एक गोळीबाराची घटना घडली आहे. वॉलमार्टच्या एका स्टोरमध्ये ही घटना घडली असून, गोळीबारात आतापर्यंत १० जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

या घटनेसंबंधी शहरातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. अमेरिकेच्या वर्जीनियाच्या वॉलमार्टच्या एका स्टोरमध्ये बंदूकधारी व्यक्तींनी नागरिकांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात अनेक जण मारले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावेळी गोळीबार करणारा शूटरही मारला गेला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत १० नागरिकांचा या घटनेत मृत्यू झाल्याची शक्यता आहे. चेसापीक पोलिसांनीही वॉलमार्टच्या स्टोरमध्ये गोळीबार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (Latest Marathi News)

Virginia Walmart Shooting/News Agency
Nanded Crime : विवाहित महिलेला हॉटेलवर घेऊन गेला; तरुणासोबत घडली भयंकर घटना

रुग्णालयात गोळीबार, २ ठार

अमेरिकेच्या (America) डलास आणि कॅलिफोर्नियामध्येही गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये एकूण तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. डलासमध्ये शनिवारी रुग्णालयात गोळीबार झाला. त्यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत संशयित बंदूकधारीही जखमी झाला आहे.

Virginia Walmart Shooting/News Agency
Solapur Crime : पत्नीकडे परपुरुषानं पाहू नये म्हणून पतीचं संतापजनक कृत्य; नाभिकाला घरी बोलावलं अन्...

मेथोडिस्ट हेल्थ सिस्टम रुग्णालयात ही घटना घडली. शनिवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला. रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी यासंबंधी जबाब दिला आहे. मेथोडिस्ट हेल्थ सिस्टमचा एक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचला. त्यानं संशयित बंदूकधाऱ्याशी लढा दिला. त्याच्यावर गोळीबार केला. त्यात तो जखमी झाला. दरम्यान, मारल्या गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांची नावे सांगितली नाहीत. ते कोणत्या पदावर कार्यरत होते, याबाबतही माहिती दिली नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com