अरे बापरे! महिलेला जडलं चक्क भिंत खाण्याचं व्यसन; आठवड्याला खाते 3 फूट भिंत

सुरुवातीला ही महिला फक्त खडू खायची, पण आता तर ती आठवड्याभरात चक्क 3 फुट भिंत खाते
अरे बापरे! महिलेला जडलं चक्क भिंत खाण्याचं व्यसन; आठवड्याला खाते 3 फूट भिंत
woman eats wallsSaam Tv

नवी दिल्ली : लहानपणी प्रत्येकाला काही ना काही विचित्र सवयी असतात. पण जडलेल्या या सवयी जर वेळेत सुधारल्या नाही तर, त्या म्हातारपणानंतरही आपला माग सोडत नाही. अशातच लागलेली सवय ही वाईट असेल तर त्यामुळे सर्वांसमोर लाजण्याची वेळ येते. त्यामुळे लहान मुले चुकीच्या गोष्टी खाऊ नये म्हणून पालक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून असतात. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. ही महिला आपल्या लहानपणीच्या सवयीमुळे हैराण झाली आहे. लहानपणी तिला लागलेली सवय आता तिचे व्यसन बनले आहे. व्यसन काही साधेसरळ नाही, तर चक्क भिंत खाण्याचं आहे.

woman eats walls
Parenting Tips : किशोरवयीन मुलांना सांभाळताना या गोष्टी लक्षात ठेवा.

माहितीनुसार, या महिलेला लहानपणी खडू खाण्याची सवय होती. मात्र मोठे झाल्यानंतर तिच्या सवयीचे व्यसनात रुपांतर झाले. सुरुवातीला ही महिला फक्त खडू खायची, पण आता तर ती आठवड्याभरात चक्क 3 फुट भिंत खाते. ऐकून आश्चर्य वाटेल, पण एका महिलेसोबत हा विचित्र प्रकार घडत आहे. निकोल असं या महिलेचं नाव असून ती अमेरिकेतील मिशिगन शहरात राहते. निकोलला लहानपणी खडू खाण्याची सवय होती. मग त्याचे व्यसन होऊन ती भिंतीकडे वळली. निकोलला वेगवेगळ्या भिंतींची चव घेणे आवडते.

निकोलने एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना सांगितले की, आईच्या निधनानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यानंतर तिला खडू खाण्याची सवय लागली. खडू खात असताना तिला कोरड्या भिंतींचा वासही आवडू लागला. त्यानंतर बघता-बघता ती भिंत खाण्याकडे वळाली. निकोलने उघड केले की, तिला वेगवेगळ्या भिंतींचे परीक्षण करणे आवडते. तसेच आठवड्यातून ती 3 चौरस फूट भिंत खाते. निकोलचं लग्न झालं असून ती एका मुलाची आई सुद्धा आहे. जेव्हा तिला भिंत खाण्याची इच्छा होते तेव्हा ती भिंत खाऊ लागते. निकोल केवळ स्वत:च्याच नाही तर, शेजारी आणि नातेवाईकांच्या घरांच्या भिंती देखील खाते.

दरम्यान, निकोलच्या या सवयीबद्दल तिला डॉक्टरांनी देखील सावध केले आहे. जर वेळत ही सवय तिने सोडली नाही तर, तिला गंभीर आजाराला सामोरं जावं लागू शकतं. डॉक्टरांनी सांगितले की, निकोलच्या या सवयीमुळे तिला कॅन्सरसारखा गंभीर आजारही होऊ शकतो. कारण भिंतींवरील पेंटमध्ये रसायने असतात. निकोलच्या या सवयीमुळे तिचे शेजारी आणि नातेवाईक तिच्यावर प्रचंड नाराज आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.