Goa: अमित शहा 14 आणि 15 तारखेला गोवा दौऱ्यावर

१३ तारखेला देवेंद्र फडणवीस देखील गोवा दौऱ्यासाठी जाणार आहेत.
Goa: अमित शहा 14 आणि 15 तारखेला गोवा दौऱ्यावर
Goa: अमित शहा 14 आणि 15 तारखेला गोवा दौऱ्यावरSaam Tv

गोवा - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah येत्या १४ आणि १५ तारखेला गोवा Goa दौऱ्यावर असणार आहे. ते दक्षिण गोव्यातील एका कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. गोव्याच्या निवडणुकांसाठी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांचा हा दौरा असणार आहे. १३ तारखेला देवेंद्र फडणवीस देखील गोवा दौऱ्यासाठी जाणार आहेत. अमित शहा यांच्यासह देवेंद्र फडणवीस १३ आणि १४ तारखेला गोव्यात असणार आहेत.

हे देखील पहा -

शिवाय भाजपचे आमदार, मंत्री, पदाधिकारी यांच्या बैठकाही अमित शहा घेणार असून आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शहा यांची गोवा भेट भाजपसाठी महत्त्वाची असून पक्षातर्फे त्यांचे स्वागत व इतर बैठकांचे कार्यक्रम निश्चित करण्यासाठी तयारी केली जात असल्याची माहिती भाजपतर्फे देण्यात आली आहे.

Goa: अमित शहा 14 आणि 15 तारखेला गोवा दौऱ्यावर
अनिल देशमुखांना मोठा झटका; सीबीआय करणार मुलाला आणि सुनेला अटक?

शिवसेनेने गोवा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असताना आता भाजपने देखील निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे. त्यामुळे आता स्वतः अमित शहा गोव्यात येऊन आढावा घेणार आहेत. १३ तारखेला देवेंद्र फडणवीस गोव्यात जाऊन आढावा घेणार आहेत. तर 14 तारखेला अमित शहा यांच्या सोबत बैठक घेऊन ते नागपूरला संघाच्या दसऱ्याच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com