Amit Shah News : अमित शहांचा कडक शब्दांत इशारा; म्हणाले, मणिपूरमध्ये हिंसा घडवून आणणाऱ्यांना सोडणार नाही!

Manipur Clashes News Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीची घोषणा केली. मणिपूर हिंसाचाराची चौकशी न्यायालयीन आयोगामार्फत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
Amit Shah on Manipur Clashes Update
Amit Shah on Manipur Clashes Update saam tv

Manipur Clashes News Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीची घोषणा केली. मणिपूर हिंसाचाराची चौकशी न्यायालयीन आयोगामार्फत केली जाईल. तर हिंसाचाराशी संबंधित सहा घटनांची चौकशी सीबीआयमार्फत केली जाईल, असे अमित शहा यांनी सांगितले. हिंसा घडवून आणणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा अमित शहांनी यावेळी दिला.  (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) हे सध्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हिंसाचाराच्या घटनेची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली. हायकोर्टाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील न्यायालयीन आयोगामार्फत ही चौकशी केली जाईल. याशिवाय या हिंसाचाराशी संबंधित सहा घटनांची चौकशी सीबीआय करेल, असे अमित शहा यांनी सांगितले.

Amit Shah on Manipur Clashes Update
Ajit Pawar On Amit Shah : अमित शहांसोबतच्या भेटीच्या चर्चेवर अजित पवारांनी केला खुलासा; म्हणाले, मुंबईमध्ये अमित शहा...

मणिपूर हिंसाचारात (Manipur Clashes) जीव गमावलेल्या व्यक्तींच्या पीडित कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी अमित शहा यांनी केली.

मणिपूर दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी इंफाळमध्ये पत्रकार परिषद घेत अमित शहांनी हिंसाचाराच्या घटनेवर भाष्य केले. गैरसमजातून हिंसा झाली आहे. राज्य विकासाच्या मार्गावर जात आहे. गेल्या सहा वर्षांत विकासाची कामे खूप झाली आहेत.

मणिपूरमध्ये भाजपचे सरकार आल्यापासून हिंसाचार मुक्तीच्या दिशेने जात आहे. हिंसेत कुणाचाही जीव गेला तरी, ते दुःखद आहे. गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या भागांत जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.

Amit Shah on Manipur Clashes Update
Manipur Clashes: मणिपूर हिंसाचारानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, एका सदस्याला नोकरी

हिंसा घडवून आणणाऱ्यांना सोडणार नाही- शहा

हिंसा घडवून आणणाऱ्यांना यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी निर्वाणीचा इशारा दिला. अशा लोकांना अजिबात सोडणार नाही, असे ते म्हणाले. अफवांवर विश्वास ठेवू नका. शांतता राखावी असं आवाहनही त्यांनी केलं. सर्व नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवल्या जातील. वैद्यकीय असो की धान्य पुरवठा सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com