
कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) गुरुवारपासून तीन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहे. अमित शाह यांचा हा दौरा भाजपसाठी महत्वाचा मानला जात आहे. पश्चिम बंगालचा हा दौरा भाजप पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी महत्वपूर्ण आहे. या दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी संध्याकाळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि 'बीसीसीआय'चे अध्यक्ष सौरव गांगुली यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमित शाह आणि सौरव गांगुली (sourav ganguly) यांच्या या होणाऱ्या भेटीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पश्चिम बंगालचा दौरा भाजपसाठी महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान अमित शाह हे शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता माजी क्रिकेटपटू आणि 'बीसीसीआय'चे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या घरी जाण्याची शक्यता आहे. त्याआधी अमित शाह हे सहा वाजण्याचा दरम्यान 'व्हिक्टोरिया मेमोरियल'मध्ये एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात सौरव गांगुली यांच्या पत्नी डोना गांगुली यादेखील उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाची सांगता झाल्यावर केंद्रीय गृहमंत्री डोना गांगुली यांच्या घरी जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी अमित शाह हे सौरव गांगुली यांच्या घरी रात्रीचे भोजन करण्याची शक्यता आहे. अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे सध्या 'बीसीसीआय'चे सेक्रेटरी आहे. यामुळे शाह आणि गांगुली कुटुंबाचा स्नेह वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप पक्षात प्रवेश करण्याची चर्चा रंगली होती. सौरव गांगुली हे भाजपच्या पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचेही बोलले जात होते. मात्र, निवडणुकीच्या आधी सौरव गांगुली यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी केली असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीसाठी सौरव गांगुली यांची साथ मिळावी, यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सौरव गांगुली यांच्या भेटीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बॅनर्जी म्हणाल्या की, पाहुण्यांचे स्वागत करणे ही पश्चिम बंगालची संस्कृती आहे. जर भेट होत असेल तर, मी सौरव गांगुली यांना अमित शाह यांना पश्चिम बंगालची प्रसिद्ध गोड पदार्थ असलेला 'गोड दही' द्यायला सांगेल.
Edited By - Vishal Gangurde
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.