देशात आगामी होणारी जनगणना १०० टक्के अचूक होणार : अमित शाह

Amit shah News : देशात आगामी जनगणना डिजिटल स्वरुपात होईल.
देशात आगामी होणारी जनगणना १०० टक्के अचूक होणार : अमित शाह
Amit shah says Next Census will be E-CensusSaam Tv

नवी दिल्ली : देशात आगामी जनगणना डिजिटल स्वरुपात होईल. या डिजिटल माध्यमातून ही जनगणना १०० टक्के अचूक होईल. ई-जनगणना (e-census) माध्यमातूनच संपूर्ण देशाची जनगणना पार पाडली जाणार आहे. या आगामी जनगणनेच्या माध्यमातूनच पुढील २५ वर्षांच्या विकास योजना आखल्या जातील, अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली आहे. ते आसामच्या जनगणना भवन उद्घाटनाच्या ई-लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. (Amit shah says Next Census will be E-Census )

हे देखील पाहा -

पुढे अमित शाह म्हणाले की, 'जनगणना (Census) देशासाठी अनेक दृष्टीतून महत्वपूर्ण आहे. आसाम राज्यासाठी तर फार महत्वाची आहे. जनगणनेमुळे विकास, एससी आणि एसटी वर्गाची स्थिती समजते. तसेच डोंगराळ, शहर आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची जीवनशैलीबद्दल देखील माहिती मिळते. तसेच हा आसामसाठी संवेदनशील विषय आहे'. अमित शाह यांच्या हस्ते सदर कार्यलयाचे उद्घाटन झाल्यावर त्यांनी देशातील विकास योजनेसाठी जनगणनेवर भर देत असल्याचे सांगितले. सदर जनगणनेमुळे व्यक्तीचे १८ वर्षानंतर मतदार यादीत नावाचा सामावेश करण्यात येईल. तसेच व्यक्तीच्या मृत्यूनंतर रद्द देखील करता येईल. या प्रक्रियेमुळे नाव आणि पत्ता बदलणे देखील सोपे होईल,असेही गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

Amit shah says Next Census will be E-Census
सावधान! कोरोनानंतर आता आणखी एका व्हायरसचं संकट? या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या बोडोलँड प्रादेशिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहेत. केंद्र आणि आसाम सरकार हे बोडो समुदायासाठी तरतुदी करत आहे,असेही शाह म्हणाले. पुढे शाह म्हणाले की,'सात वर्षापूर्वी भाजपने आसामच्या सीमेवरील दहशतवाद संपवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृह विभागाने अतिरेकी संघटनेशी शांततेचा सामंज्यस करार केला होता. आतापर्यंत ९००० अतिरेकींनी आत्मसमर्पण केलं आहे. केंद्र सरकारने जानेवारी २०२० मध्ये 'बोडो'सोबत शांततेचा सामंज्यस करारावर सह्या देखील केल्या होत्या'.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.