उमेश कोल्हे प्रकरण : ३ आरोपींना पाकिस्तानसहित अन्य देशांतून आले होते फोन; आरोपींकडून धक्कायदायक खुलासा

अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपींपैेकी तीन आरोपींना ३ संशयित आंतरराष्ट्रीय फोन आले होते. सदर संशयित कॉल हे आरोपी इरफान शेख, अब्दुल तौफिक आणि आतिब राशिद यांना हे फोन आले होते.
Amravati killing case
Amravati killing case saam tv

नवी दिल्ली : अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपींपैेकी तीन आरोपींना ३ संशयित आंतरराष्ट्रीय फोन कॉल आले होते. सदर संशयित कॉल हे आरोपी इरफान शेख, अब्दुल तौफिक आणि आतिब राशिद यांना हे फोन आले होते. या तिघांना २५ मे रोजी जर्मनी, ब्रिटेन आणि पाकिस्तानातून फोन आले होते. या आरोपींनी चौकशीदरम्यान हा धक्कादायक खुलासा केला आहे, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या (NIA) सूत्रांनी दिली आहे. (Amravati Umesh Kolhe Case Update)

Amravati killing case
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 'आप'चे ठरले; या उमेदवाराला देणार पाठिंबा

एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार, उदयपूरच्या शिंपी व्यावसायिकाच्या हत्येचे मुख्य आरोपी आणि अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्येचे मुख्य आरोपी यांचे कनेक्शन आहे की नाही किंवा दोन्ही प्रकरणांचा मुख्य आरोपी हा एकच आहे. याचा तपास करण्यासाठी एनआयए त्या अमरावती प्रकरणातील आरोपींना राजस्थानमध्ये घेऊन जाण्यात येणार आहे.

दरम्यान, मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी अमरावतीमध्ये हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. उमेश दुकान बंद करून रात्री निघाले होते. उमेश कोल्हे यांनी भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या पोस्टचे समर्थन केलं होतं. त्यामुळे हल्लेखोरांकडून कोल्हे यांची हत्या झाली होती.

Amravati killing case
रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झाल्यास बलात्काराचा गुन्हा होऊ शकत नाही: सुप्रीम कोर्ट

दरम्यान, एनआयएने शुक्रवारी मुंबईतील एका कोर्टाने म्हटले की, नुपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने अमरावतीतील मेडिकल व्यावसायिकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे. सदर प्रकरणातील सात आरोपी हे एनआयएच्या ताब्यात आहेत. कोर्टाने 'एनआयए' संस्थेला आरोपींचा सोपावलेला ताबा हा २२ जुलैपर्यंत वाढविला आहे. एनआयए संस्थेने सदर तपास अमरावती (Amravati) पोलिसांच्या हातून स्वत:कडे घेतला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com