WhatsApp वर 'अमूल'चा मेसेज आला तर सावधान! बँक अकाऊंट होवू शकते खाली

व्हॉट्सअॅपवर पैशांचे आमिष दाखवणारे मेसेज रोज येत राहतात. मग बऱ्याच वेळानंतर आपली फसवणूक झाली आहे हे कळते.
WhatsApp वर 'अमूल'चा मेसेज आला तर सावधान! बँक अकाऊंट होवू शकते खाली
WhatsApp वर 'अमूल'चा मेसेज आला तर सावधान! बँक अकाऊंट होवू शकते खालीTwitter

नवी दिल्ली: देशात आणि जगात झपाट्याने वाढत जाणारे डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरामुळे सायबर गुन्हे आणि डिजिटल फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. हॅकर्स आर्थिक फसवणूक करण्यासाठी आणि तुमची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी अनेक मार्ग वापरतात. यापैकी एक मार्ग म्हणजे व्हॉट्सअॅपवरील संदेशातील लिंकद्वारे वापरकर्त्यांच्या बँक खात्यात प्रवेश करणे. व्हॉट्सअॅपवर पैशांचे आमिष दाखवणारे मेसेज रोज येत राहतात. मग बऱ्याच वेळानंतर आपली फसवणूक झाली आहे हे कळते. आजकाल दुग्धजन्य पदार्थ बनवणाऱ्या अमूल या कंपनीच्या नावाने लोकांना लक्ष्य केले जात आहे. जर तुम्हाला अमूल कडून दरमहा 6,000 रुपये कमवण्याची संधी देणारा मेसेज आला असेल तर काळजी घ्या.

WhatsApp वर 'अमूल'चा मेसेज आला तर सावधान! बँक अकाऊंट होवू शकते खाली
अमेरिकेत थेट घरावर कोसळलं विमान; अंगावर काटा आणणारा Video पाहा

WhatsApp वर लिकं पाठवून फसवणूक

अमूलच्या नावाने पाठवल्या जाणाऱ्या या लिंकवर क्लिक करून तुम्ही एका वेबसाइटवर पोहोचता. अमूलचा लोगो या पृष्ठाच्या शीर्षस्थानी ठेवला आहे. खाली लिहिले आहे, 'अमूलचा 75 वा वर्धापन दिन' आणि खालच्या बाजूला मोठ्या अक्षरांनी लिहिलेले आहे 'अभिनंदन'. त्याच्या खाली एक ओळ 'तुम्हाला प्रश्नावलीद्वारे 6000 रुपये मिळण्याची संधी मिळेल' असे लिहिले आहे. या खाली तुम्हाला प्रश्न दिसतील. याचे उत्तर दिल्यानंतर तुम्हाला तीन प्रश्न विचारले जातील. यानंतर, तुमच्या स्क्रीनवर 9 बॉक्स बनवले जातील, जे अमूलच्या लोगोप्रमाणे डिझाइन केले गेले आहेत. यामध्ये तुम्हाला कोणत्याही एका बॉक्सवर क्लिक करण्यासाठी तीन संधी दिल्या जातील. जर तुम्ही बॉक्सवर क्लिक कराल तर तुम्हाला 6000 रुपये मिळतील असे सांगितले जाते.

हे सगळं इथेच संपत नाही, या फसवणुकीचा सर्वात मोठा खेळ असा आहे की जेव्हा तुम्ही ही लिंक 20 मित्र किंवा 5 व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर कराल तेव्हा तुम्हाला हे 6000 रुपये मिळतील असे सांगितले जाते. विशेष म्हणजे काही कमेंट्स देखील खाली दाखवण्यात आल्या आहेत, ज्यात अनेक लोकांनी 6000 रुपये मिळाले असे लिहिले आहे. कोणीतरी लिहिले आहे की ही पद्धत खूप चांगली आहे. ही संपूर्ण साइट अशा प्रकारे तयार केली गेली आहे की कोणत्याही सुशिक्षित व्यक्तीला प्रथम फसवले जाऊ शकते.

अमूलने जनतेसाठी आपल्या अधिकृत ट्विटरवरुन हे सगळं खोटं असल्याची माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर स्पॅम लिंकसह एक बनावट मेसेज शेअर केला जात आहे. या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. त्यात पुढे म्हटले आहे की अमूल अशी कोणतीही मोहीम चालवत नाही. हा मेसेज जास्तीत जास्त तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करण्याचे आवाहन अमूल ने केले आहे.

एका क्लिकवर बँक अकाऊंट होऊ शकते खाली

ई-सायबरप्लानेटने आपल्या सायबर तज्ञांच्या हवाल्याने असे म्हटले आहे हा एक व्हायरस आहे. हा खूप मोठा घोटाळा असू शकतो, जिथे फसवणूक करणारे तुमचे पैसे, वैयक्तिक डेटा किंवा इतर माहिती शोधत असतील. जेव्हा वापरकर्त्याने लिंकचा पत्ता तपासला तेव्हा असे आढळून आले की तो अमूलच्या अधिकृत वेबसाइटचा नाही. हॅकर्स आपला फोन किंवा कॉम्प्युटरवर मालवेअर किंवा व्हायरस इन्स्टॉल करण्यासाठी त्याचा वापर करू शकतात. जर तुम्हाला असा मेसेज अज्ञात क्रमांकावरून आला असेल तर व्हॉट्सअॅपवर घोटाळा म्हणून तक्रार करा आणि ब्लॉक करा.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com