पती झोपेत करायचा असे कृत्य, शेवटी कंटाळून पत्नीने घेतला अजब निर्णय!

एका महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने सांगितले आहे की ती आणि तिचा पती वेगवेगळ्या खोलीत का झोपतात.
Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video: इंस्टाग्रामवर एका Influencer महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती तिच्या पतीपासून वेगळे झोपण्याचे कारण सांगत आहे. Influencer Taylor Paul ने सांगितले की, तिचा नवरा कधी झोपेत बोलतो, तर कधी झोपेत चालायला लागतो, यामुळे तिने तिच्या पतीला वेगळ्या खोलीत झोपायला सांगितले आहे.

टेलर पॉल ने हे देखील सांगितलं की, तिला गरम वातावरणात झोपायला आवडते. तर तिच्या पतीला थंड वातावरणात झोपायला आवडते. टेलरला झोपताना शांती हवी असते पण तिचे पती व्हाईट नॉईज मशीनचा वापर करतात. टेलरने व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की, याआधी अनेकदा तिचा नवरा रात्री शर्ट शोधायचा. एके रात्री तो दुसऱ्या खोलीत शर्ट शोधायला गेला तेव्हा त्याने तिच्या पतीला गेस्ट रुममध्येच झोपण्याचा सल्ला दिला.

Viral Video
सरकारची मोठी घोषणा! 10-12वीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थांना मिळणार हेलिकॉप्टर राईड

टेलरने सांगितले की, जेव्हा तो गेस्ट रूममध्ये झोपला तेव्हा त्यालाही खूप चांगली झोप लागली. टेलर पुढे म्हणाली, आम्ही दोघेही वेगळ्या खोलीत झोपतो, पण आम्हा दोघांचे लग्न खूप यशस्वी झाले आहे. आम्ही दोघेही खूप खुश आहोत. पण फक्त आम्ही दोघेही स्वतंत्र खोल्या पसंत करतो.

हे देखील पहा-

टेलरच्या अय व्हिडिओवर खूप मजेशीर कमेंट्स आल्या आहेत. एका युजरने लिहिले, मी असं कधीच करू शकलो नसतो. तर एका दुसऱ्या युजरने लिहिले, आम्ही दोघे पण वेगवेगळ्या खोलीत झोपतो कारण माझे पती खूप घोरतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com