फाड पावती! मास्क नसल्यामुळे पोलिसांनी अडवले; संतापलेल्या वकिलाने पोलिसांसमोर झाडल्या गोळ्या

कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत चालेल्या रुग्णसंख्येत दिल्लीमध्ये नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यूसह विविध निर्बंध लावण्यात आले.
फाड पावती! मास्क नसल्यामुळे पोलिसांनी अडवले; संतापलेल्या वकिलाने पोलिसांसमोर झाडल्या गोळ्या
फाड पावती! मास्क नसल्यामुळे पोलिसांनी अडवले; संतापलेल्या वकिलाने पोलिसांसमोर झाडल्या गोळ्याsaamtv

वृत्तसंस्था: कोरोना आणि ओमायक्रॉनच्या (omicron) वाढत चालेल्या रुग्णसंख्येत (patient) दिल्लीमध्ये (Delhi) नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यूसह (Weekend curfew) विविध निर्बंध (Restrictions) लावण्यात आले आहेत. एवढेच नाही तर या काळामध्ये कोविड (Covid) प्रोटोकॉलचे पालन करण्याची महत्त्वाची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर (police) आहे. यादरम्यानच दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मास्क (Mask) घालण्यास सांगितल्याने संतापलेल्या व्यक्तीने पोलिसांसमोरच आपल्या बंदुकीतून (gun) ५ गोळ्या झाडल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, गोळ्या झाडणारा व्यक्ती हा व्यवसायाने वकील आहे. शनिवारी रात्री उशिरा कर्फ्यू दरम्यान सीमापुरी (Seemapuri) चौकामध्ये कार चालवताना पोलिसांनी त्याला बघितले आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे तो संतापला आणि त्याने आणि पत्नी- बहिणीने पोलिस कर्मचाऱ्यांशी (staff) देखील गैरवर्तन केले आहे.

हे देखील पहा-

त्यानंतर आरोपीने पोलिसांशी वाद घालण्यास सुरवात केली आणि त्याच्या परवाना असलेल्या पिस्तुलाने जमिनीवर ५ गोळ्या झाडले आहे. यादरम्यान इतर पोलिस देखील तेथे पोहोचले होते. परंतु, आरोपी दारुच्या नशेत असावा, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेविषयी अद्याप कोणाला देखील अटक करण्यात आली नाही. कोरोनाव्हायरस जगभरात तीव्रगतीने वाढत असताना दिल्ली सरकारने सार्वजनिक ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी मास्क तोंडावर नसल्याने ५,०७३ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

फाड पावती! मास्क नसल्यामुळे पोलिसांनी अडवले; संतापलेल्या वकिलाने पोलिसांसमोर झाडल्या गोळ्या
खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा; नवी मुंबईत 4 दिवसात तब्बल 1390 पोलिसांना कोरोना

मिळालेल्या आकडेवारीनुसार, कोविड नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध शनिवारी ६१ एफआयआर नोंदवण्यात आले आहे. आणि उल्लंघन करणाऱ्यांकडून १.२५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आकडेवारीनुसार ११ जिल्ह्यांमध्ये मास्कच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल ५०७३ जणांना, ७४ जणांना सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल आणि ५१ जणांना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com