भूकंपाच्या धक्क्याने अफगाणिस्तान हादरले; 255 लोकांचा मृत्यू

या भूकंपामुळे आतापर्यंत २५५ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Earthquake
EarthquakeSaam Tv

Afghanistan Earthquake: भारताच्या शेजारील अफगाणिस्तानमध्ये आज सकाळी भूकंप झाला. मिळालेल्या माहितीनुसार हे धक्के ६.१ रिश्टर स्केलचे होते. सध्या भूकंपामुळे (Earthquake) किती नुकसान झाले आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. अफगाणिस्तानच्या दक्षिणपूर्व भागाकडील पक्तिका प्रांतामध्ये भूकंपाने हाहाकार उडवून दिला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत २५५ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. भूकंपाची माहिती मिळताच बचावकार्यासाठी प्रशासन कामाला लागले असून हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहे. हा भूकंप इतका जोरदार होता की शेजारील पाकिस्तानातील लाहोर, मुलतान, क्वेटा येथेही लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले.

पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के

पाकिस्तानी मीडियानुसार, इस्लामाबादसह इतर शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. येथे ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. पाकिस्तमध्ये काही सेकंदांसाठी भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र यामुळे लोक घाबरून इकडे-तिकडे पळू लागले. पाकिस्तानात झालेल्या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे.

याआधी शुक्रवारीही पाकिस्तानमध्ये भूकंप झाला होता. त्यानंतर इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतानमध्ये हे धक्के जाणवले. फैसलाबाद, अबोटाबाद, स्वात, बुनेर, कोहाट आणि मलकांडी येथेही हे धक्के जाणवले.

Earthquake
'... अन् जास्तीत जास्त सत्ता जाईल; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

कोणता भूकंप धोकादायक ?

भूकंपाची कमाल तीव्रता अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. तथापि, रिश्टर स्केलवर ७.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप मध्यम धोकादायक मानला जातो. या स्केलवर 2 किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेच्या भूकंपाला सूक्ष्म भूकंप म्हणतात, जो बहुतेक जाणवत नाही. ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे घरांचे नुकसान होऊ शकते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com