Building Collapse: आदल्या रात्री घरात वाढदिवसाचं सेलिब्रेशन; मात्र शेजाऱ्यांची एक चूक अन् तीन मजली इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू

Visakhapatnam Building Collapse: विशाखापट्टनम येथील रामजोगी पेटा येथे ही घटना घडली आहे.
Building Collapse
Building Collapse Saam Tv

Andhra Pradesh News: आंध्रप्रदेशच्या विखाखापट्टनम येथे मोठी दुर्घटना घेतली आहे. तीन मजली इमारत कोसळून दोन मुलांसह तीन जणांना मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रामजोगी पेटा येथे ही घटना घडली आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी तातडीने दाखल झालं होतं.

Building Collapse
Viral News : बापरे! बेडवर 6 फुटांचा विषारी साप फणा वासून बसला होता; महिलेनं चादर उचलताच...

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेत एका 15 वर्षीय मुलीचाही मृत्यू झाला आहे. आदल्याच रात्री घरच्या मंडळींना आपल्या 15 वर्षीय मुलीचा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर काही तासातच ही इमारत कोसळली. या घटनेत मुलीचाही मृत्यू झाला आहे. (Building Collapse)

विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त सीएच श्रीकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर इमारत बरीच जुनी होती. त्यात इमारतीच्या शेजारी जमिनीत पाया खोदण्यात आला होता आणि बुधवारी बोअरवेलचे काम सुरू होते. त्यामुळे इमारतीचा पाया कमकुवत झाल्याने हा अपघात झाला. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Building Collapse
MNS New Song: मनसेच्या नव्या गाण्यावर थिरकला Ranveer Singh? व्हायरल झालेल्या 2 व्हिडिओतून सत्य काय ते कळेल?

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घरात 9 लोक राहत होते. त्यापैकी सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला. पोलीस अधिक तपास करत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com