Andhra Pradesh Accident: तिरुपती बालाजीहून परतताना भीषण अपघात... ट्रकची क्रूझरला धडक; ५ जणांचा मृत्यू

Andhra Pradesh Jeep - Truck Accident: तिरुपती बालाजीचे (Tirupati Balaji) दर्शन घेवून १६ भाविक क्रुझर गाडीने घरी परतत होते.
Andhra Pradesh Jeep - Truck Accident
Andhra Pradesh Jeep - Truck AccidentSaamtv

Andhra Pradesh Accident:

आंध्रप्रदेशमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आंध्रप्रदेशच्या अन्नामाया जिल्ह्यात ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून ११ लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Andhra Pradesh Jeep - Truck Accident
Mahadev App Scam: ईडीची सर्वात मोठी कारवाई! ३९ ठिकाणी छापेमारी; १४ पेक्षा जास्त बॉलिवूड कलाकार रडारवर

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) अन्नमय जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. येथे शुक्रवारी सकाळी जीप आणि लॉरीमध्ये जोरदार धडक झाली, या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

तिरुपती बालाजीचे (Tirupati Balaji) दर्शन घेवून १६ भाविक क्रुझर गाडीने घरी परतत होते. गाडीला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातातील मृतांपैकी चारजण बेळगाव जिल्ह्याच्या बडची गावातील एकाच कुंटुबातील आहेत. तर पाचव्या मृताचा पत्ता शोधण्याचे काम सुरु आहे.

हनुमंता आजुर (वय ५२), महानंदा आजुर (वय ४६), शोभा आजुर (वय ३६), अंबीका आजुर (वय १९ चौघेही रा. बडची ता. अथणी जि. बेळगाव), मनमंथ जाधव (वय ५२) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात जखमी झालेल्या ११ जणांपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. (Latest Marathi News)

Andhra Pradesh Jeep - Truck Accident
Thane News: औषधांच्या ओव्हर डोसमुळे ८ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू? शवविच्छेदनास विरोध करत मृतदेह घेऊन बाप रुग्णालयातून पसार; प्रकरण काय?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com