VIDEO | कारच्या छतावर बसून घासून-घासून काच साफ केली, पाहा या चिंपांझींचा कारनामा

दोन चिंपांझी एका काळ्या रंगाच्या कारवर चढलेले आहेत आणि ते कारवार बसून कारची काच घासून घासून साफ (Chimpanzee Washing Car) ​करत आहेत.
चिंपांझींनी कारच्या छतावर बसून घासून-घासून काच साफ केली
चिंपांझींनी कारच्या छतावर बसून घासून-घासून काच साफ केलीSaam Tv

मुंबई : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ शेअर होत असतात. त्यातल्यात्यात प्राण्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात (Animal Viral Video). हे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या अधिक पसंतीस उतरतात. पण कधी-कधी असे व्हिडीओही पाहायला मिळतात जे आश्चर्यचकित करुन सोडतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन चिंपांझी आश्चर्यकारक काम करताना दिसत आहेत - Animal Viral Video See Chimpanzee Washing Car

कार स्वच्छ करणारे चिंपांझी

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन चिंपांझी एका काळ्या रंगाच्या कारवर चढलेले आहेत आणि ते कारवार बसून कारची काच घासून घासून साफ (Chimpanzee Washing Car) ​करत आहेत. त्यांच्याकडे बघून असे वाटते जणू ते कार साफ करणारेच आहेत. दोन्ही चिंपांझींच्या हातात कार साफ करणारे कपडेही आहेत.

पाहा व्हिडीओ -

तुम्ही माणसांना गाड्या धुताना आणि साफ करताना नेहमीच पाहिलं असेल. पण कार स्वच्छ करणारे चिंपांझी पाहून नक्कीच तुम्हाला खूप आश्चर्य वाटलं असेल.

चिंपांझी हे बुद्धिमान प्राणी मानले जातात जे मानवाप्रमाणे प्रतिक्रिया देतात. मुलांसोबत खेळताना आणि माणसांसारखे कपडे धुताना, माणसाप्रमाणे वागतानाचे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांना त्यांचे व्हिडीओ खूप आवडतातही.

चिंपांझींनी कारच्या छतावर बसून घासून-घासून काच साफ केली
काय सांगता! मार खाऊन बक्कळ पैसा कमावते ही व्यक्ती

कार स्वच्छ करतानाचा चिंपांझीचा हा व्हिडीओ नुकताच wildsplanet नावाच्या आयडीवरुन इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत 9 लाख 96 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर, 39 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे.

त्याचबरोबर व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने 'फ्री कार वॉशिंग' असे लिहिले आहे, तर दुसऱ्या यूजरने 'घरातील सर्वात धोकादायक प्राणी' असे लिहिले आहे. याशिवाय, आणखी एका यूजरने 'फ्री लेबर' असे लिहिले आहे, तर दुसऱ्या यूजरने 'त्याला कार वॉशरमध्ये कामावर ठेवण्याची गरज आहे' असे लिहिले आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com