पवार - मोदी भेटीवर अंजली दमानिया म्हणाल्या: महाराष्ट्राचं वाटोळं आता...

या भेटीनं राजकीय क्षेत्रात अनेक चर्चांना उधाण आलय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमीनिया यांनी या भेटीवर निशाणा साधलाय.
पवार - मोदी भेटीवर अंजली दमानिया म्हणाल्या: महाराष्ट्राचं वाटोळं आता...
पवार - मोदी भेटीवर अंजली दमानिया म्हणाल्या: महाराष्ट्राचं वाटोळं आता...Saam Tv News

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी PM narendra modiआणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार NCP leader sharad pawar यांची दिल्लीत delhi भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. सहकार क्षेत्रावर Cooperative sector चर्चा झाल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील NCP leader jayant patil यांनी सांगितलं. मात्र या भेटीनं राजकीय क्षेत्रात अनेक चर्चांना उधाण आलय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमीनिया social worker anjali damania यांनी या भेटीवर निशाणा साधलाय. anjali damania comments on sharad pawar and narendra modi meeting

आपल्या ट्विटमध्ये अंजली दमानिया म्हणतात की,

''15 जुलै फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?), 16 जुलै फडणवीस दिल्ली ला जातात ,17 जुलै शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही.''

एकीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळेल असं विरोधक वारंवार म्हणतात, तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शरद पवार भाजपविरोधी गटांची मोर्चेबांधणी करण्याच्या प्रयत्नांत दिसतायत. मात्र मोदी आणि पवारांची जवळीक तसेच पंतप्रधानपदासाठी शरद पवारांची असलेली महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही, त्यामुळे या भेटीनंतर अनेक तर्क - वितर्क लावले जातायत.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com