
जगाच्या काही शहरांमध्ये कोविड केसेसमध्ये घट झाल्यामुळे दोन वर्षांपासून अधिक काळ बंद असलेली कार्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. कार्यालयात परत बोलावल्यानंतर अनेकांनी नोकरीचा राजीनामा दिला. बरेच लोक पुन्हा ऑफिसमधून काम करण्यास उत्सुक आहेत, मात्र काही जणांनी ऑफिसमधून काम करण्यासाठी विरोधही दर्शवला आहे. कारण विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, यामुळे प्रवासासह इतर गोष्टींवर खूप वेळ जातो आणि पैसेही वाया जातात.
Apple कंपनीचे मशीन लर्निंगचे संचालक, इयान गुडफेलो (Ian Goodfellow) यांनाही कदाचित असेच वाटले असावे आणि त्यांना कार्यालयात परत येण्यास जेव्हा सांगितले तेव्हा त्यांनी चक्क अॅपलमधील इंजिनिअर नोकरीचा राजीनामा दिला! (Apple Engineer Left Job)
Zoe Schiffer यांनी ट्विटद्वारे माहिती दिली
झो शिफरच्या म्हणण्यानुसार, इयानने आपल्या टीम सदस्यांना कंपनी सोडण्याच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. झो यांनी ट्विट केले की, "अॅपलचे मशीन लर्निंगचे संचालक, इयान गुडफेलो, कामावर परतण्याच्या पॉलिसीमुळे ते कंपनी सोडत आहेत. कर्मचार्यांना दिलेल्या नोटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "माझ्या टीमसाठी कामातील अधिक लवचिकता सर्वात महत्त्वाची आहे यावर माझा विश्वास आहे."
हे देखील पाहा-
नवीन वर्क पॉलिसीनुसार कर्मचाऱ्यांनी 11 एप्रिलपर्यंत आठवड्यातून किमान एक दिवस, 2 मे पासून आठवड्यातून किमान दोन दिवस आणि 23 मे पासून आठवड्यातून किमान तीन दिवस काम करावे लागेल. Apple ने आपल्या कर्मचाऱ्यांना 23 मे पासून आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात परतण्यास सांगितले आहे. मात्र, काही कर्मचारी अॅपलच्या या नव्या पॉलिसीवर खुश नाहीत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.