भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू; अमित शहा म्हणाले...

भारतीय जनता पक्षाचा युवा कार्यकर्ता अर्जुन चौरसिया यांच्या मृत्यूप्रकरणी भाजपने (BJP) कठोर भूमिका घेतली
भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू; अमित शहा म्हणाले...
West Bengal Crime Saam Tv

कोलकाता : भारतीय जनता पक्षाचा युवा कार्यकर्ता अर्जुन चौरसिया यांच्या मृत्यूप्रकरणी भाजपने (BJP) कठोर भूमिका घेतली आहे. गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांनी अर्जुनचा मृत्यू हा खून असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर अमित शाह यांनी अर्जुनच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत ((cbi ) चौकशी केली जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

हे देखील पाहा-

अमित शहा यांनी ममता सरकारवर सडकून टीका केली

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) २ दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून, अर्जुन चौरसिया यांच्या घरी पोहोचून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. अर्जुन चौरसिया यांची हत्या झाल्याचे त्यांनी सांगितले. बंगालमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यांनी ममता सरकारला (government) घेरले आणि म्हटले की, बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर न्यायालयाचाही (court) विश्वास राहिला नाही.

कोलकात्यातील चितपूरमध्ये मृतदेह सापडला

भाजप नेते अर्जुन चौरसिया यांचा मृतदेह कोलकात्याच्या (Kolkata) चितपूरमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. चौरसिया यांचा सकाळी गूढ अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना अशावेळी समोर आली आहे, जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २ दिवसांच्या नियोजित दौऱ्यावर पश्चिम बंगालमध्ये उपस्थित आहेत.

West Bengal Crime
एका महिलेचा किती अपमान केला हे महाराष्ट्रानं पाहिलं- राणा

उत्तर कोलकाता भाजपचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्षाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली २०० बाईक घेऊन रॅली काढण्याचे नियोजन आम्ही केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पण आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी ऐकून विश्वासच बसत नव्हता.

काय म्हणाले दिलीप घोष?

भाजप नेते दिलीप घोष म्हणाले, "गेल्या काही वर्षांपासून जेव्हा भाजपने येथे (पश्चिम बंगाल) विजय मिळवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आमच्या कार्यकर्त्यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. गेल्या काही वर्षांत २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला अर्जुन चौरसिया याला आता मारून फाशी देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.