Sudan Clash : सुदानमध्ये लष्कर-निमलष्करी दलाचे जवान भिडले; तुफान गोळीबार, स्फोट आणि हल्ले...

Army Clashes with Paramilitary Forces In Sudan : सुदानमध्ये निमलष्करी दलाचे जवान आणि लष्कराचे जवान आपापसांत भिडले.
Army Clashes with Paramilitary Forces In Sudan
Army Clashes with Paramilitary Forces In SudanSAAM TV

Army Clashes with Paramilitary Forces In Sudan : सुदानमध्ये निमलष्करी दलाचे जवान आणि लष्कराचे जवान आपापसांत भिडले. सुरक्षा दलांमध्येच टोकाचा संघर्ष पेटल्यानं तेथील भारतीय नागरिकांसाठी दूतावासाकडून अॅडव्हायझरी जाहीर केली आहे.

सुदानमधील भारतीयांनी आपल्या घराबाहेर पडू नये. त्यांनी घरातच थांबावे अशा सूचना भारतीय मिशनकडून देण्यात आल्या आहेत. सुदानमधील या दोन्ही दलांचे सैनिक एकमेकांच्या ठिकाणांवर हल्ले करत आहेत.  (Latest News)

Army Clashes with Paramilitary Forces In Sudan
Japan PM Kishida : मोठी बातमी! जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्ब हल्ला

सूदानची राजधानी खार्तूमस्थित भारतीय (Indians) दूतावासानं ट्विट केलं आहे. गोळीबार आणि संघर्ष सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व भारतीयांनी सतर्कता बाळगावी. त्यांनी घरातच थांबावं. त्यांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना दिल्या जात आहेत आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, असे त्यात नमूद केले आहे. (Army)

तर काही प्रत्यक्षदर्शींनी घटनेबद्दल माहिती दिली. दक्षिण खार्तूममध्ये रॅपिड सपोर्ट फोर्स तळाजवळ दोन्ही दलांच्या सैनिकांमध्ये झटापटी आणि त्याठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकल्याचे सांगितले जात आहे.

नेमका कशामुळे संघर्ष पेटला?

सूदानमधील सैन्यदलात निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) चे नियोजित विलीनीकरणावरून लष्करी नेता अब्देल फतेह अल बुरहान आणि निमलष्करी दलाचे कमांडर मोहम्मद हमदान डागलो यांच्यात काही आठवड्यांपासून तणाव वाढत चालला होता. त्यानंतर शनिवारी या ठिकाणी हिंसाचार झाला. प्रत्यक्षदर्शींनी दक्षिण खार्तूममधील आरएसएफच्या तळाजवळ सैनिकांमध्ये संघर्ष झाल्याचे सांगितले. तुफान गोळीबार आणि जोरदार स्फोटांचे आवाज ऐकल्याचेही त्यांनी सांगितले.

Army Clashes with Paramilitary Forces In Sudan
Satyapal Malik on Pulwama Attack: मोदी सरकारच्या चुकीमुळेच पुलवामा हल्ला, J&Kच्या माजी राज्यपालांच्या आरोपांनी देशात खळबळ

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विमानतळाजवळील परिसरात सैन्यांनी भरलेले ट्रक जाताना दिसून आले. तर आरएसएफच्या दाव्यानुसार, त्यांनी खार्तूम विमानतळावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. एएफपी वृत्तसंस्थेनुसार, तोफांच्या माध्यमातून रस्त्यावर दगडफेक केली गेली आणि त्यानंतर नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावाधाव सुरू केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com