बारामुल्लामध्ये लष्कराची मोठी कारवाई, तीन पाक दहशतवादी ठार

पोलीस आणि सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पाकिस्तानचे तीन दहशतवादी ठार.
Baramulla Encounter
Baramulla EncounterSaam Tv

जम्मू काश्मिर: जम्मू काश्मिर मधील बारामुल्ला येथे दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. बारामुल्लामध्ये पोलीस (Police) आणि सुरक्षा दलांनी संयुक्त ऑपरेशनमध्ये तीन दहशतवादी मारले गेले. या कारवाईत जम्मू काश्मिरचे एक पोलीस शहीद झाले आहेत. सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले तीन दहशतवादी पाकिस्तानचे होते. त्यांच्याकडून अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. (Baramulla Encounter)

काश्मीर (Kashmir) पोलिसांचे आयजी विजय कुमार यांनी ही माहिती दिली. या घटनेपूर्वी मंगळवारी दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा येथील पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. यावेळी पोलिसांनी आत्मसंरक्षण करत प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात तीन नागरिक जखमी झाले. दहशतवाद्यांनी एका पोलिसाची हत्या केली.

Baramulla Encounter
ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात; लवकरच होणार सुनावणी

या अगोदर मंगळवारीही कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हल्ल्यानंतर पोलीस (Police) जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या दहशतवादी हल्ल्यात तीन नागरिक जखमी झाले आहेत. सौरा भागातील मलिक साब येथील रहिवासी पोलीस कर्मचारी सय्यद कादरी यांचा मुलगा सैफुल्लाह कादरी यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात एका शहीद पोलिसाची (Police) मुलगीही जखमी झाली.

Baramulla Encounter
राज्यात 2 लाख 44 हजार 405 पदे रिक्त, गृह विभाग अव्वल स्थानी

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना अटक केली होती. १३ मे रोजी जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले होते.(Baramulla Encounter)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com