चीनचं पुन्हा नवं नाटक, अरुणाचल प्रदेश आमचा अविभाज्य भाग - भारत

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेले
चीनचं पुन्हा नवं नाटक, अरुणाचल प्रदेश आमचा अविभाज्य भाग - भारत
चीनचं पुन्हा नवं नाटक, अरुणाचल प्रदेश आमचा अविभाज्य भाग - भारतSaam Tv

India China Row: उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. ज्यावर चीनने आक्षेप घेतला होता. यावर, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे की आम्ही अशा टिप्पण्या नाकारत आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक आहे. भारताचे राजकारणी नियमितपणे भारताच्या इतर कोणत्याही राज्याप्रमाणे भेट देत असतात. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे, की भारतीय नेत्यांच्या भारतीय राज्याच्या भेटीला आक्षेप घेण्याचे कारण समजण्यापलीकडचे आहे.

पहा व्हिडिओ-

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की, "भारताने बेकायदेशीरपणे स्थापन केलेल्या तथाकथित अरुणाचल प्रदेशला चीन मान्यता देत नाही आणि भारताच्या उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अलीकडील दौऱ्याला तीव्र विरोध करत आहोत." या परिसराला चीनमध्ये झांगनान म्हणतात.

चीनचं पुन्हा नवं नाटक, अरुणाचल प्रदेश आमचा अविभाज्य भाग - भारत
Hingoli | महाराजांच्या पुतळ्यावर चढून घातला हार... (पहा व्हिडिओ)

या आठवड्यात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी २ दिवसाच्या दौऱ्यामध्ये अरुणाचल प्रदेशला भेट दिली होती. त्यांनी अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या विशेष सत्राला संबोधित करण्यात आले होते. आपल्या राज्याच्या दौऱ्या दरम्यान, त्यांनी अरुणाचल प्रदेशातील लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर प्रमुख व्यक्तींशी संवाद साधला आहे. आणि त्यांना पुढे येऊन लिंगभेद आणि मादक पदार्थांच्या व्यसनासारख्या विविध सामाजिक वाईट गोष्टींबद्दल तरुणांना शिक्षित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.