Arvind Kejriwal Cbi Inquiry : अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी, आप पक्ष आक्रमक; राज्यभरात सत्याग्रह आंदोलन

अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी, आप पक्षाचं सत्याग्रह आंदोलन
Arvind Kejriwal Cbi Inquiry
Arvind Kejriwal Cbi Inquiry Saam TV

Arvind Kejriwal Cbi Inquiry : मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. याच्याच निषेधार्थ राज्यभरात आप कार्यकर्त्यांकडून भाजपविरोधी सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं आहे.

Akola News Today : अकोल्यात आप कार्यकर्ता आक्रमक

मोदी सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप करत आपने अकोला येथील गांधी जवाहर बाग येथे निषेध नोंदवला. मोदी सरकारच्या दडपशाही करीत असल्याचा आरोप करत गांधी जवाहर बाग येथे आपच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. (Latest Marathi News)

Arvind Kejriwal Cbi Inquiry
Maharashtra Politics News : विरोधी पक्षाला फोडण्याचा भाजपचा प्लॅन? शाहांसोबतच्या बैठकीत मेगाप्लॅन?

Pune News Today : पुण्यात आप कार्यकर्त्यांचं सत्याग्रह

पुण्यातही आप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमत केजरीवाल यांना सीबीआयने दिलेल्या नोटिशीविरोधात सत्याग्रह आंदोलन केलं. पुण्यात राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यात आला. यावेळी काळी फीत दंडाला बांधून मोदी सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला.

Arvind Kejriwal Cbi Inquiry
Sanjay Raut on Sharad Pawar: 'भाजपात जाण्यासाठी कुटुंबियांवर दबाव, सिल्व्हर ओकवरील बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य,' राऊतांचा गौप्यस्फोट

Dombivli News Today : डोंबिवलीत आपकडून भाजपच्या निषेधार्थ आंदोलन

डोंबिवलीत आपच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर शांततापूर्ण आंदोलन करत भाजपचा निषेध नोंदवला. यावेळी आप कार्यकर्त्यांकडून अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला विचारलेल्या प्रश्नांमुळे सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवलं, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नसल्यामुळे वेळ प्रसंगी केजरीवालांना तुरुंगात टाकून भाजपकडून दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार बरखास्त केले जाऊ शकते, असा आरोप केला

दरम्यान, दिल्ली दारू धोरण प्रकरणी सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली. काही दिवसांपूर्वी सीबीआयने सीएम केजरीवाल यांना चौकशीत सहभागी होण्याची नोटीस दिली होती.

नोटीसनंतरच सीएम केजरीवाल रविवारी सीबीआय कार्यालयात पोहोचले. मात्र सीबीआयने त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांना कोणते प्रश्न विचारले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या सगळ्या दरम्यान आता सीबीआय या प्रकरणात केजरीवाल यांनाही अटक करू शकते, असे आम आदमी पक्षाला वाटत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com