Ashok Gehlot : मी सोनिया गांधींची माफी मागितलीय; काँग्रेस अध्यक्षपदाबाबत अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा

अशोल गहलोत यांच्या घोषणेनंतर आता काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न कायम आहे.
Ashok Gehlot Latest News
Ashok Gehlot Latest NewsTwitter/@ashokgehlot51

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी माघार घेतली आहे. अशोक गहलोत यांनी काँग्रेस (Congress) हायकमांड सोनिया गांधी यांची भेट घेतली त्यानंतर ही घोषणा केली आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत याबाबत चर्चा केल्याचंही गहलोत यांनी सांगितलं आहे. अशोल गहलोत यांच्या घोषणेनंतर आता काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न कायम आहे.

Ashok Gehlot Latest News
Rahul Gandhi: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे ४० पोस्टर फाडले; कर्नाटकात भलतंच राजकारण

गेल्या काही दिवसात देशभरात चर्चा रंगली आहे की, मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासा प्राधान्य देत आहे. मात्र मी माझी बाजू सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत मांडली आहे. मला मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे, असा संदेश संपूर्ण देशात असा गेला आहे. याबाबत मी सोनिया गांधींची माफी मागितली आहे, असंही ते म्हणाले. (Latest Marathi News )

Ashok Gehlot Latest News
महिलेची इच्छा नसताना पतीने स्पर्श केला तरी तो गुन्हाच; 'मॅरिटल रेप'वर SCचा मोठा निर्णय

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. गेल्या 50 वर्षांपासून मी काँग्रेसशी प्रामाणिक आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्यामुळेच मी तिसऱ्या्ंदा मुख्यमंत्री बनलो आहे. मात्र आता मी मुख्यमंत्रीपदी कायम राहणार की नाही याबाबतचा निर्णय सोनिया गांधीच घेतील असंही त्यांनी सांगितलं आहे.

एकीकडे अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी या निवडणुकीसाठी आपलं नामांकन दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेस खासदार शशी थरुर देखील 30 सप्टेंबर रोजी आपला अर्ज दाखल करणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com