Odisha Balasore Train Accident: ...अन् अश्विनी वैष्णव यांना अश्रू अनावर; म्हणाले 'आमची जबाबदारी अद्याप संपलेली नाही...'

या रेल्वे अपघातात २८८ लोकांचा मृत्यू झाला. तर ११७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Odisha Balasore Train Accident
Odisha Balasore Train AccidentSaam Tv

Ashwini Vaishnaw News: ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी भीषण रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली. या रेल्वे अपघातात २८८ लोकांचा मृत्यू झाला. तर ११७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यातील ५६ लोक गंभीर जखमी असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  (Latest Marathi News)

Odisha Balasore Train Accident
Monsoon 2023: शेतकऱ्यांची चिंता वाढणार! मान्सून उशिराने दाखल होणार, मुंबईत 'या' दिवशी धडकणार

यादरम्यान, या दुर्घटनेसंबंधी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. प्रसारमाध्यमांशी बोलताना दुर्घटनेत बेवारस मृतदेहांचा उल्लेख करताना ते भावूक झाले. याचवेळी त्यांनी आमची जबाबदारी अद्याप संपली नसल्याचं म्हटलं.

बालासोर रेल्वे अपघात स्थळावरील रेल्वे ट्रॅकच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. आता दोन्ही बाजूंनी रेल्वे वाहतुकीसाठी मार्ग मोकळा झाला आहे. एका बाजूचे काम एका दिवसात पूर्ण झाले, आता दुसऱ्या जागेचे कामही पूर्ण झाले आहे. (Train Accident)

यानंतर त्यांनी रेल्वे अपघातातील बेपत्ता लोकांचा उल्लेख केला. बेवारस झालेल्यांची कुटुंबीयांशी लवकरात लवकर भेट व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. रेल्वे वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र आमची जबाबदारी अद्याप संपली नाही.

घटनास्थळी 24 तास युद्धपातळीवर काम केलं जात आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी ठाण मांडून बसले आहेत. हजारो रेल्वे कर्मचारी, बचावकार्य पथकं, तंत्रज्ञांपासून ते इंजिनिअर्स सर्वजण दिवसरात्र काम करत आहेत. घटनास्थळी दुर्घटनेनंतर असणारं भीषण चित्र आता बदलत आहे. ट्रॅकवरील ट्रेनचे डबे आता हटवण्यात आले आहेत. यावेळी बोलताना रेल्वेमंत्री भावूक झाले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com