
Assam groom video viral : सोशल मीडियावर आतापर्यंत दारूच्या नशेत धुंद असणाऱ्या व्यक्तींचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. लग्न आणि हळदीच्या कार्यक्रमातही अनेकांना दारूच्या नशेत अनेकांना बेधुंद होऊन नाचताना पाहिले असतील. सोशल मीडियावर चक्क लग्नमंडपात एका नवरदेव दारूच्या नशेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दारच्या नशेत नवरदेव लग्नमंडपात झोपल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
दारुच्या नशेत नवरदेव लग्नमंडपात पोहोचला...
आसामच्या नलबाडी जिल्ह्यातील हा नवरदेव आहे. हा नवरदेव त्याच्या लग्नात चक्क दारुच्या नशेत पोहोचला. त्यानंतर त्याच्या मित्राच्या मांडीवर डोक टेकवत चक्क आरामात झोपी गेला. या नवरदेवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
स्वत:च्या लग्नातच दारू पिऊन येणाऱ्या नवरदेवाला (Groom) लग्नात आलेल्या वर्हाडी लोकांनी अशी अद्दल घडवली की, कोणताही नवरदेव लग्नात दारू पिऊन येण्यास दहा वेळा विचार करेल.
प्रसेनजीत असे लग्नात दारू पिऊन येणाऱ्या नवरदेवाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजण्याची आहे. नवरदेवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वऱ्हाडी भडकल्याचे नवरदेवाला कळताच नवरदेव घाबरला. त्यानंतर नवरदेव जमिनीवर लोळताना दिसला.
नवरीने केला लग्न करण्यास नकार
नवरदेवाला दारूच्या नशेत पाहून नवरी मुलीने लग्न करण्यास नकार दिला. नवरी थेट पोलीस स्टेशन गाठत नवरा मुलगा आणि त्याच्या घरातील लोकांच्या विरोधात तक्रार दिली. त्याचबरोबर मुलीच्या घरच्यांनी लग्नासाठी लागलेल्या खर्चाच्या बदल्यात नुकसान भरपाई मागितली.
दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, वर पक्षातील अनेक जण हे दारूच्या नशेत धुंद होते. लग्न चांगलं सुरू होतं. लग्नासाठीची सर्व विधी प्रक्रिया केली होती. मात्र, नवरदेवाला व्यवस्थित नीट चालताही येत नव्हतं. त्यानंतर स्थानिक नेत्याच्या कानावर ही वार्ता टाकली. त्याचबरोबर या घटनेबद्दल पोलिसांना माहिती दिली. या नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेक नेटकऱ्यांनी या नवरदेवावर टीका केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.