
गुवाहाटी, आसाम : आसाम राज्यातील गुवाहाटी येथील एका महिला पोलीस उपनिरिक्षकाने (Sub-Inspector of Police) आपल्याच होणाऱ्या नवऱ्याला अटक (Arrest) करत बेड्या ठोकल्या आहेत. आसामच्या नगाव जिल्ह्यातील पोलीस उप-निरीक्षक जोनमणी राभा (Jonmani Rabha) यांनी स्वतःच्याच होणाऱ्या नवऱ्याला अटक केली आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव राणा पगग (Rana Pagag) असून त्याला फसवणूक, ओळख लपवणे आणि खोटी ओळख सांगून लग्न करण्याच्या प्रयत्न करणे या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. एका महिला पोलीस उप-निरीक्षकाशी (Woman Police) केलेली फसवणूक या आरोपीला चांगलीच महागात पडली आहे. (Assams Lady Singham: Woman Police Officer Arrests Her Boyfriend in Nagaon - Sentinelassam)
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार जोमनणी राभा यांची २०२१ ला माजुली (majuli assam) येथे पोस्टींग झाली होती. याचदरम्यान त्याची ओळख राणा पगग याच्याशी झाली. पगग हा स्वतःला ओएनजीसी कंपनीत जनसंपर्क अधिकारी असल्याचं सांगत होता. काही दिवसांच्या भेटींनंतर पगग याने जोनमणी यांना लग्नाचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला जोनमणी यांनी होकार दिला. त्यानंतर दोघांचेही कुटुंबिय एकमेंकांना भेटल्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये जोनमणी आणि राणा पगग यांचा साखरपूडा झाला. तर नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांचं लग्न ठरलं होतं, मात्र २०२२ च्या सुरुवातीला जोनमणी यांना पगग याच्या काम करण्याच्या पद्धतींमध्ये हालचालींवर संशय आला. कारण जोनमणी यांनी स्वतः जनसंपर्क आणि जाहिरात क्षेत्रात पदवी घेतली आहे. त्यामुळे त्यांना जनसंपर्क या क्षेत्राची चागंली माहिती होती. मात्र पगग याच्यावर संशय आल्यानं त्यांनी याबाबत गुप्तपणे चौकशी सुरु केलीय यात त्यांना तीन लोकांकडून धक्कादायक माहिती मिळाळी. त्यांनी जोनमणी यांना सांगितलं की, पगग याने कंत्राटाच्या नावाखाली २५ लाख रुपयांचा घोटाळा केला आहे. सोबतच पगग हा ओएनजीसी कंपनीत कधीच कामाला नव्हता अशी माहिती मिळाल्यावर जोनमणी यांच्या पायाखालची वाळू सरकली. यानंतर पगग याला जोमनणी यांनी अटक केली.
अटक केलेल्या पगग याची कसून चौकशी केली असता समजंलं की, स्वतःला श्रींमंत आणि हाय-प्रोफाईल दाखवण्यासाठी त्याने एक एसयूव्ही कार भाड्याने घेतली होती. सोबतच एक ड्रायव्हर आणि एक बॉडीगार्डलाही त्याने कामावर ठेवलं होतं. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर जोनमणी राभा यांनी पगग याला अटक केली. जोनमणी म्हणतात की, मी देवाचे आभार मानते की, मी यात फसले नाही. घडलेल्या प्रकाराबाबत मी बिल्कुल दुःखी नाही. पगग याच्याकडून नकली कागदपत्रं, खोटे ओळखपत्रं, मोबाईस, लॅपटॉप, चेकबूक आणि आणखीन काही आक्षेपार्ह कागदपत्रं जत्प केली आहेत. जोनमणी म्हणाल्या की, मी आसामच्या लोकांना कडक संदेश देऊ इच्छिते की, जर कुणी चुकीचं काम केलं तर मी त्याला सोडणार नाही. माझ्या परीवारातलेही असेल तरी त्यांना सोडणार नाही. दरम्यान महिला पोलीस उप-निरीक्षकाली फसवण्याचा प्रयत्न आरोपीच्या अंगाशी आला आहे.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.